सावधान ! दोन PAN कार्ड असतील तर ‘एवढा’ दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याजवळ दोन पॅनकार्ड असतील आता तुम्हाला तात्काळ एक पॅनकार्ड परत करावे लागणार आहे. जर तुम्ही हे पॅनकार्ड परत केले नाहीत तर तुम्हाला १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. आयकर विभागाच्या १९६१ च्या अधिनियमानुसार २७२ या कलमांतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. काळे धन आणि पॅन कार्ड धारकांची संख्या तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विषयी बोलताना म्हटले आहे कि, पॅनकार्ड म्हणजे एक युनिक नंबर असतो. त्यामुळे ज्याप्रकारे दोन व्यक्तींचे किंवा कंपनीचे पॅन कार्ड समान नसतात त्याच प्रकारे एक व्यक्ती दोन पॅनकार्ड वापरू शकत नाही. जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर तात्काळ जमा करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता. नाव बदलणे, पत्ता बदलणे किंवा इतर बदलांसाठी देखील एकाच प्रकारचा फॉर्म उपलब्ध असतो.

दरम्यान, पॅनकार्ड परत करण्यासाठी तुम्हाला नॅशनल सिक्योरिटीज डिपॉजिटरी लिमिटेडच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पॅनकार्ड रद्द करण्यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला पॅनकार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास याच ठिकाणी अर्ज करू शकता.

आरोग्यविषयक वृत्त