ITR भरण्यात काही चूक झाली असेल तर अगदी सहजपणे भरू शकता ‘सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न’, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपण पगाराच्या वर्गातून येत असाल किंवा आपला स्वतःचा व्यवसाय असेल तर आपण दरवर्षी आयकर विवरणपत्र (ITR) भरत असाल. तथापि, अनेक वेळा आयकर विवरणपत्र भरल्यानंतर आपल्याला आठवते की आपण आयकर रिटर्नमध्ये कोणत्याही विशिष्ट उत्पन्नाचा उल्लेख केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारची सूट मिळवण्यासाठी क्लेम भरणे बाकी राहिले आहे. बर्‍याच प्रकरणांमध्ये तर आपल्याला आपले आयकर विवरणपत्र भरल्यानंतर कित्येक दिवसांनी किंवा महिन्यांनी आपण केलेल्या चुकीबद्दल समजते. हे लक्षात घेऊन आयकर विभाग करदात्यांना भरलेल्या आयटीआरमध्ये बदल करण्याची परवानगी देतो.

कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ आणि पैसा बाजार डॉट कॉमचे मुख्य लेखापरीक्षक बलवंत जैन म्हणाले की जर मूळ आयटीआर मध्ये उत्पन्नाशी संबंधित कोणताही तपशील भरणे राहिले असेल किंवा कोणतीही माहिती भरण्यात काही चूक झाली असेल तर सुधारित आयटीआरमध्ये त्यात सुधारणा केली जाऊ शकते.

त्यांनी सांगितले की आयकर कायदा, 1961 च्या कलम 139 (5) अंतर्गत सुधारित आयकर रिटर्न दाखल करता येतो. ते म्हणाले की आपण आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर आयकर सूट मिळवण्यासाठी क्लेम करणे विसरला असाल तर सुधारित आयटीआरमध्ये आपण असे करू शकता. याशिवाय बँक खात्यांशी संबंधित तपशील देण्यास आपण काही चुकला असाल तर आपण त्यास देखील सुधारित करू शकता.

जैन म्हणाले की आपण मूल्यांकन वर्ष पूर्ण होण्यापूर्वी किंवा मूल्यांकन पूर्ण होण्याअगोदर (यातून जे आधी होईल) सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करू शकता. उदाहरणार्थ, आपण आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयकर विवरणपत्र दाखल केले असेल आणि त्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर आपण मूल्यांकन वर्ष 2020-21 पूर्ण होण्यापूर्वी किंवा आयकर विभागाकडून आपल्या आयकर रिटर्नच्या मूल्यांकनापूर्वी सुधारित रिटर्न भरू शकता.

जैन म्हणाले की सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया मूळ रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे. याचा अर्थ असा की आपण मूळ रिटर्न भरल्याप्रमाणेच सुधारित रिटर्न देखील भरू शकता. सुधारित रिटर्न भरताना आपल्याला सुधारित रिटर्न्सच्या बॉक्सला टिक करायचे असते. या व्यतिरिक्त तुम्हाला याकरिता तुमचा मूळ नोंदणी क्रमांक आवश्यक असतो. ते म्हणाले की आयकर विवरण भरताना कोणतीही घाई करू नये आणि तुम्ही त्याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे.