‘उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर जाण्याची गरज नसेल, त्यांना आधी देशातच लढावं लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मनसेच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबईत पार पडले. यावेळी पक्षांचा झेंडा लॉन्च करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरेंनी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ असे म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि पक्षांचा नवा झेंडा आवडला का असे कार्यकर्त्यांना विचारले. यावेळी देशातील सैनिकांना युद्ध झाल्यास आधी देशाशी लढावे लागेल असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की, आपल्या सणावर जेव्हा बंधन आणली गेली तेव्हा मनसेच उभी राहिली होती. धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावा, मशिदीवरील भोंगे बंद झाले पाहिजे हे तेव्हाही मी बोललो होते. आमची आरती त्रास देत नाही, तुमचा नमाज का त्रास देतोय, भोंगे लावून नमाज नको, भोंगे बंद करुन नमाज पठन करा.

पाकिस्तानी, बांग्लादेशी मुसलमानांना हकलून द्या हे मी आधीही सांगितलं होतं तेव्हा मला कोणीही विचारलं नाही, हिंदूत्वाकडे चालला आहेत का ? हिंदुत्व म्हणजे काय मला सांगा. भारत काय धर्मशाळा आहे का ? कोणीही याचच आणि इथं येऊन बसायच. बांग्लादेशातून भारतात यायला फक्त 2,500 रुपये लागतात, पाकिस्तानातून भारतात नेपाळ मार्गे येतात. एनआरसी, सीएए बद्दल बोलण्याआधी ती समझोता एक्सप्रेस बंद करा, ती बस आधी बंद करा. उद्या जर युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बाहेर जाण्याची गरज नसेल, त्यांना आधी देशातच लढावं लागेल.

जे देशाशी प्रामाणिक मुसलमान आहेत ते आमचेच आहेत, आम्ही एपीजे अब्दुल कलाम यांना, जहीर खान यांना नाकारु शकत नाही, जावेद अख्तरांना नाकारु शकत नाही. जावेद अख्तर म्हणाले होते की, उर्दु ही मुसलमानांची भाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं. भाषा ही एका भागाची (रिजनची) असते. परंतु कोणी धिंगाना घातला तर आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही आडवे जाऊ.

रझा अकादमीच्या लोकांनी जेव्हा महिला पोलिसांवर हात टाकला होता तेव्हा मनसे पुढे आली. पाकिस्तानी कलाकारांना हकलण्याचे काम मनसेनेच केले होते. तेव्हा मला विचारले नाही की हिंदुत्वाकडे चालला आहात का ?

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like