आजचा सामना हरल्यास विराट कोहलीवर येणार ‘ही’ नामुष्की

कॅनबेरा : फलदांजांसाठी नंदनवन म्हटल्या जाणार्‍या कॅनबेरातील हा सामना भारताला जिकणे आवश्यक आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या कर्णधार विराट कोहलीसाठीही आजचा सामना अतिशय महत्वाचा आहे. जर हा सामना भारत हारला तर सलग सहाव्या एकदिवसीय सामन्यात ३० वर्षानंतर प्रथमच पराजित होण्याची नामुष्की भारतावर येणार आहे. यापूर्वी भारत १९८९ मध्ये सलग ६ एकदिवसीय सामन्यात पराभूत झाला होता. त्यावेळी सुनिल गावस्कर कर्णधार असताना सलग ६ सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर आता विराट कोहलीच्या नावावर ही नामुष्की लागण्याचा धोका आहे.

यापूर्वी महेंद्रसिंग धोनी, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर कर्णधार असताना सलग ५ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. १९८१ मध्ये भारताला सलग ८ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यात ७ सामन्यात गावसकर तर एका सामन्यात विश्वनाथ कर्णधार होते.

कोहलीच्या दृष्टीने आजची सुरुवात चांगली झाली आहे. भारताने शुभमन गिल याचा संघात समावेश केला आहे. या मैदानावर आतापर्यंतच्या ७ सामन्यांपैकी ६ सामन्यात ३२०पेक्षा अधिक धावा करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे भारताला सामना जिंकायचा असेल तर साडेतीनशे धावांचा पल्ला गाठावा लागेल.