भाड्याने राहणारे आता सहज बदलू शकतील ‘आधारकार्ड’वरील पत्‍ता, UIDAI नं बदलले नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाड्याने राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रावर कायस्वरूपी पत्ता देणे फार अवघड होऊन जाते. यामुळे आता आधार तयार करणाऱ्या कंपनीने पत्ता बदलण्यासाठी एक नवीन प्रक्रिया तयार केली आहे. यामध्ये तुम्ही तुमचा भाडे करार वापरून पत्ता बदलू शकता. मात्र यासाठी त्यावर तुमचे स्वतःचे नाव असायला हवे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हि पद्धत सांगणार आहोत.

अशाप्रकारे करा भाडे कराराद्वारे अपडेट –

यासाठी तुम्हाला तुमचा भाडेकरार स्कॅन करून त्याचे एका पीडीएफ फाईलमध्ये रूपांतर करावे लागेल. त्यामुळे तुम्हाला पत्ता अपडेट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

अशाप्रकारे बदला पत्ता –
1) सर्वात आधी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच  https://uidai.gov.in वर जा
2) यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या अॅड्रेस अपडेट रिक्वेस्ट वर क्लिक करा.
3) त्यानंतर पत्ता अपडेट करा
4) आधार कार्ड नंबर टाकून लॉग-इन करा.
5) तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक टाकून पोर्टलवर जावा.

आधार केंद्रावर जाऊन बदलू शकता पत्ता –
ऑनलाईन बदलांप्रमाणेच तुम्ही आधार केंद्रावर जाऊन देखील तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता तसेच इतर बायोमेट्रिक माहिती देखील बदलू शकता.

आधार अपडेटला इतका लागतो चार्ज –
नाव, पत्ता, लिंग, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर यांसारख्या अपडेटसाठी 50 रुपये घेतले जातात. त्याचबरोबर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी देखील 50 रुपये शुल्क घेतले जाते.

Visit – policenama.com