गणेशोत्सवात दारू प्याल तर कारवाई, बापट यांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून तो नेहमीच मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, उत्सवादरम्यान काही कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीत मद्यपान करून धिंगाणा घालतात. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते, याचे भान कार्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे. गणेशोत्सवात दारू प्याल तर ११ दिवस पोलिस कोठडी दिली जाईल, असा इशारा पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
[amazon_link asins=’B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’637484c7-a7c0-11e8-9737-2d0613dfe182′]
बापट म्हणाले, गणपती विसर्जनावेळी मूठभर कार्यकर्ते दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्यामुळे उत्सव आणि मंडळाच्या प्रतिमेला गालबोट लागते. कार्यकर्त्यांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे. तसेच धार्मिक सण साजरा करताना प्रत्येकाने इतर धर्माचा अनादर होणार नाही, याची काळजी घ्यावी. काही समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करून जाती-धर्मात विष पेरण्यासाठी कार्यरत असतात. मात्र, आपण उत्सवाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सामाजिक आणि जातीय सलोखा टिकवून ठेवण्यासाठी काम केले पाहिजे. गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत यंदाच्या वर्षी केली पाहिजे. सामाजिक भावनेतून अनेक मंडळे स्वच्छता, वृक्षारोपण, सामाजिक कामासाठी मदत करतात. तसेच गणेशोत्सवादरम्यान जनजागृतीपर देखावे तयार करून सामाजिक संदेश देतात, त्यांचा मला अभिमान वाटतो.