खबरदार… आमच्या पोलीस अधिकारी, कमर्चाऱ्यांच्या विरोधात बोलाल तर : राहुल दुबाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. आमच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात जर बोललात तर याद राखा असा सज्जड दम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिला आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी. शहीद हेमंत करकरेंना शाप देण्यासाठी तुमच्यात तेवढी दैवी शक्ती नाही. तुम्ही एक स्वयंघोषीत साध्वी आहात. जे देशासाठी शहीद झालेले महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व जवानांच्या भावना दुखावल्या आहेत. याचे उत्तर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तुम्हाला आवश्य देईल, असे राहुल दबाले यांनी म्हंटले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना तुम्ही शाप दिला म्हणून ते शहीद झाले असे म्हणता, असे म्हणताना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे.

तुमच्यात एवढी ताकत आहे तर भारतातील बेरोजगारी, भारतातील आत्महत्या, गरिबी, भारतावर होणारे हल्ले याच्या विषयी का शाप देत नाहीत. स्वतःच्या प्रसिद्धी साठी तुम्ही शाहीद अधिकारी यांना काहीही बोलता, याद राखा आमच्या महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीशी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना खंबीर उभी आहे. शाहीद हेमंत करकरे देशासाठी रक्षण करताना शाहीद झालेत. तुमच्या सारखे भगवे कपडे घालून लोकांना येड्यात काडून नाही झाले. त्यांचे लाखो वेळा जरी माफी मागितली तरी कमी असल्याचे सांगत त्यांनी साध्वी प्रज्ञा यांना सज्जड दम दिला आहे.