आम्हाला सोबत घ्यायचे असेल तर आचारसंहितेपूर्वी तोडगा काढा अन्यथा… : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाडघडीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे असेल तर आचारसंहितेपूर्वी तोडगा काढा अन्यथा उर्वरित २६ जागांवरील उमेदवारही घोषित करणार. असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला दिला.

आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. इतकेच नव्हे तर, काही दिवसांपूर्वी सर्व हेवेदावे बाजूला सारून शिवसेना – भाजपाने युतीची घोषणाही केली. याचबरोबर, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला आघाडीत घेण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठकही झाली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी १२ जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने आघाडीत १२ जागा देण्यास स्पष्ट नकार देत ४ जागा देण्याचे म्हंटले होते. याबाबत मागणीही काँग्रेसने केली होती. मात्र प्रकाश आंबेडकर आघाडीत १२ जागांसाठी ठाम असल्याचे समोर आले होते. इतकेच नव्हे तर काल झालेल्या आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत आली तर, सर्वांची ताकद दिसेल आणि आघाडी यशस्वी होईल त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले होते.

याचदरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाडघडीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे असेल तर आचारसंहितेपूर्वी तोडगा काढा अन्यथा उर्वरित २६ जागांवरील उमेदवारही घोषित करू असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. काल झालेल्या आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे २२ जागांची मागणी केली आहे. यामध्ये माढा, बारामती, आणि नांदेडच्या जागेचा समावेश आहे.