काय सांगता ! ‘या’ हॉटेलमध्ये प्रेग्नंट राहिल्यास महिलेला मिळतात 70 लाख रुपये, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –या जगात अनेक असे चित्रविचित्र देश आहेत जे आपल्या खास कारणांसाठी ओळखले जातात. जगभरात ते फेमस आहेत. असाच एक देश आहे ज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. एक असं हॉटेल आहे जिथं महिला गर्भवती झाल्यानंतर 70 लाख रुपये देतं.

एका देशात असं एक हॉटेल आहे जिथं जर महिला प्रेग्नंट राहिली तर 70 लाख रुपये हॉटेलकडून दिले जातात. परंतु यासाठी हॉटेलनंही एक अट ठेवली आहे जी पूर्ण केली जाणं गरजेचं आहे. ज्या हॉटेलबद्दल आम्ही बोलत आहोत त्याचं नाव योह्दा असून हे इज्रायलमध्ये आहे.

हे हॉटेल वेगवेगळ्या वेळी आपल्या ग्राहकांसाठी नवीन नवीन ऑफर आणत असतं. जर तुम्ही या हॉटेलमध्ये राहिलात आणि त्यांनी ठरवलेल्या तारखेला जर महिला प्रेग्नंट राहिली तर हे हॉटेल तुम्हाला बक्षिस म्हणून जवळपास 70 लाख रुपये देतं. इतकेच नाही तर हे जिंकणाऱ्या कपलचा खर्चही हॉटेलकडून माफ केला जातो.