सतत ‘ब्ल्यूटूथ-इअरफोन्स’ वापरताय ? ‘हे’ आहेत 5 ‘धोके’, वेळीच व्हा सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वायरलेस डिव्हाईस वापरण्याची सध्या फॅशन आहे. यामध्ये ब्ल्यूट्यूथ इअरफोन अनेकजण वापरतात. हे इअरफोन स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, कॅमेरा, इत्यादी डिव्हाईसना सपोर्ट करत असल्याने ते वापरण्याकडे अनेकांचा कल आहे. परंतु, चुकीचे इअरफोन वापरल्यास कोणते दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठी कोणता इअरफोन तुमच्यासाठी आणि तुमच्या आरोग्यसाठी चांगला आहे किमान तज्ज्ञांकडून जाणून घ्या. कंपन्या विविध प्रकारचे दावे करतात, परंतु ते किती खरे हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. कारण काही प्रकारचे इअरफोन्स तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.

 

 

हे आहेत दुष्परिणाम

1  हेडफोन्सच्या अतिवापरामुळे नकळतपणे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

2  काही लोकांना कान दुखण्याची समस्या उद्भवते.

3  इअरफोन्स काढल्यानंतर बाहेरच्या गोष्टी कमी ऐकायला येतात, अशी तक्रार काहीजण करतात.

4  कमी ऐकू येण्याची समस्या सुद्धा इअरफोन्सच्या अतिवापरामुळे होते.

5  इअरफोनमुळे कानांच्या नसांवर दबाव पडत असतो. त्यामुळे कानाचे कार्य योग्यरित्या चालत नाही.

6  यामध्ये कानाच्या दुखण्याचे रुपांतर हळूहळू डोकेदुखीत होत जाते.

हे लक्षात ठेवा

खास बनावटीच्या इअरफोनमध्ये नॉईस कॅन्सलींगची सुविधा असते. यामध्ये आवाज 0 ते10 च्या मध्ये सोयीनुसार सेट करू शकतो.

* ऑनलाईल इअरफोन्सची खरेदी करू नका. नॉईस कंट्रोल कॅन्सलेशन हेडफोन्स घेत असाल तर एडजस्टेबल असावेत.