दही खात असाल ‘हे’ नक्की वाचा

पोलीसनामा ऑनलाईन – आपल्याला अनेकजण तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करण्याऐवजी दही खा असा सल्ला अनेक आहार तज्न आपल्याला देत असतात. दही खाल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात. त्यामुळे दही का खावे आणि कसे खावे जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

१) दही खाण्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. तसेच पचन क्रिया चांगली राहते. दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन तसेच शरीराला पोषक तत्व मिळतात. त्यामुळे आपण आपल्या आहारात दह्याचा समावेश करावा.

२) दही हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी दही केव्हा खावे याचा मापदंड आहे. आपल्याकडे रात्रीचे दही खाणे योग्य मानले जात आहे. मात्र, याशिवाय दही खाण्याचे काही नियम आहेत. ते आपल्याला माहित हवेत.

३) ज्यावेळी आपल्याला लवकर सर्दी-पडसे होत असेल तर तुम्ही रात्रीचे दही खावू नये. त्यामुळे सर्दीमध्ये वाढ होण्याचा धोका जास्त असतो.

४) तुम्ही दिवसा दही खात असाल तर त्यात साखर घालू नका. जर तुम्हा रात्रीचे दही खाण्याची सवय असेल तर त्यात काही प्रमाणात काळीमिरी घाला.

५) मासे, मटन खाताना दही खाऊ नये. असे केल्यास आपल्या शरीराला हानी पोहचू शकते.