तुम्ही देखील खोलीतील लाईट सुरू ठेवूनच झोपता का ? एकदा हे नक्की वाचा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  झोप चांगली झाली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. किमान 7-8 तास झोप शरीराला आवश्यक आहे. परंतु झोपताना आजूबाजूचं वातावरण कसं आहे हेही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही लाईट बंद ठेवून झोपता की, सुरू ठेवून, किंवा मग मंद प्रकाशात झोपता. प्रकाशात झोपणं योग्य की अयोग्य हे आपण आज जाणून घेणार आहोत.

एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, जर तुम्ही लाईट सुरू ठेवून झोपलात तर याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. कारण लाईट सुरू असेल तर चेहऱ्यावर पडणारा प्रकाश हा मेंदूतील ग्रंथींना शांत होण्यासाठी बाधा आणतो. त्यामुळं लाईट सुरू ठेवणं झोपणं आरोग्यासाठी आणि झोपेसाठी चांगली नाही. याचे अनेक नकारात्मक परिणाम होतात.

काय होतात परिणाम ?

– मनाची एकाग्रता कमी होते

– एकटेपणा जाणवत असेल तर याचं प्रमाण वाढतं

– स्वभाव चिडचिडा होतो.

– झोप नीट होत नाही

– स्वास्थ्यासाठी हानिकारक

– झोपच नीट झाली नाही तर दिवसभरात अत्साही वाटत नाही

– वजन वाढते. (महिलांवर केलेल्या एका रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे. याचं एक कारण असंही होतं की त्या रात्री जास्त जेवत होत्या आणि झोपताना लाईट सुरू ठेवून झोपायच्या)