‘लाईट’ बंद न करता झोपण्याचे ‘हे’ 5 ‘दुष्परिणाम’, जाणून घ्या काय करावे

पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य आणि झोप याचा खुप जवळचा संबंध आहे. शांत आणि पूर्ण झोप नियमित घेतल्यास आरोग्य चांगले राहते, अन्यथा विविध आजार तुमच्या शरीरात डोकं वर काढू शकतात. साधारणपणे प्रौढ व्यक्तीला 7 ते 8 तास घेणे आवश्यक असते. तर मुलांना 10 ते 11 तास झोप मिळालीच पाहिजे, तरच त्यांचा शारीरीक आणि मानसिक विकास योग्य प्रकारे होऊ शकाते. शिवाय, व्यवस्थित झोप झाली नाही तर दिवसभर कामात उत्साह राहात नाही, मन लागत नाही. यासाठी झोपताना आजूबाजूचे वातावरण आणि इतर गोष्टी खुप महत्वाच्या ठरतात. झोपताना लाईट चालू ठेवणे झोपणे आणि बंद करून झोपणे यापैकी एक सवय प्रत्येकाला असतो. यापैकी लाईट चालू ठेवून झोपण्याच्या सवयीमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात, ते जाणून घेवूयात…

हे आहेत दुष्परिणाम

1 झोप योग्य प्रकारे पूर्ण होत नाही. याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर व मानसिक स्थितीवर होऊ शकतो.

2 थकलेल्या शरीराला आराम मिळत नाही. मनाची एकाग्रता देखील कमी होऊ लागते.

3 एकटेपणा जाणवतो.

4 झोप पूर्ण न झाल्याने स्वभाव चिडचिडा होतो.

5 रात्री झोपताना चेहर्‍यावर पडणारा प्रकाश हा मेंदूतील ग्रंथींना शांत होण्यास बाधा आणतो.

6 एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की लाईट चालू ठेवून झोपल्यामुळे वजन वाढते. हा रिसर्च महिलांवर करण्यात आला होता. ज्या महिला टिव्ही किंवा लाईट चालू ठेवून झोपतात त्यांचे वजन अन्य महिलांच्या तुलनेत जास्त असते.

* लाईट बंद करून झोपण्याचे फायदे

1 एका रिसर्चमधून असे दिसून आले की लाईट बंद करून झोपणे. हे शरीरासाठी स्वास्थासाठी योग्य असते.

2 पूर्ण झोप मिळाल्याने, शरीरात दिवसभर उत्साह राहतो.

3 शरीर निरोगी राहते.