पावसाळ्यातही घाम येत असेल तर करा ‘हे’ उपाय

पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाचा तडाखा वाढू लागला की, घामाची समस्या निर्माण होऊ लागते. परंतु, काहींना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूत घाम येतो. सतत येणार्‍या घामामुळे दुर्गंधी येऊ लागते. एखाद्या व्यक्तीस घाम येण्याचे प्रमाण इतके वाढते की, हात व पायांच्या तळव्यांनादेखील अतिरिक्त घाम सुटतो. हात सारखे ओले होतात. एखाद्या व्यक्तीबरोबर हस्तांदोलन करायला पण नकोसे वाटते. आपल्याला जाणवते की, आपला तळहात घामामुळे ओलसर आहे. त्यामुळे पटकन हात मिळवल्यावर समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर नापसंतीचे भाव व्यक्त होतात. त्यामुळे या घामाने आपल्याला खूप समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून जर बचाव करायचा असेल तर खालील उपाय करा.

१) अतिघाम येणे ही समस्या आजार नाही असा समज असल्याने या समस्येसाठी कोणी डॉक्टरांकडे जात नाही. पण या समस्येच्या निवारणासाठी डॉक्टरांची जरूर मदत घ्यावी.

२) तसेच काही साध्या-सोप्या उपायांनी या समस्येपासून आपल्याला सुटका मिळू शकते. व आपणही आनंदाने समाजामध्ये मिसळू शकता. त्यासाठी आपल्या शक्तीपेक्षा निम्म्या शक्ती एवढाच व्यायाम करावा. जास्त घाम येण्याअगोदर व्यायाम बंद करावा.

३) सुती कपडे वापरावेत. मानेजवळ जास्त घाम येत असल्यास रुमालाची घडी मानेभोवती गुंडाळावी.

४) जास्त काळे व पांढरे कपडे घालणे टाळावे. काळ्या कपड्यात उष्णता जास्त शोषली जाते व पांढर्‍या कपड्यात घामाचे डाग लगेच दिसतात.

५) कांदा, लसूण, मसालेदार पदार्थांनी जास्त घाम येतो म्हणून यासारखा आहार कमी प्रमाणात खावा. शिळे अन्न खाणे, फास्ट फूड टाळावे. सकस, संतुलित आहार घ्यावा. फळे खावीत. भाज्या खाव्यात व भरपूर पाणी प्यावे.

६) सात ते आठ तास संपूर्ण शांत झोप घ्यावी. यामुळे तुम्हाला येणारा अतिघाम कमी होण्यास मदत होईल.

आरोग्यविषयक वृत्त –