‘आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच’ : अनिल परब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही, रागाने मारले तर का मरारलं ते बघा, अधिकाऱ्याने आपल्या मर्यादेत रहायला हवं, असं सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवृत्त अधिकाऱ्याच्या मारहाणीचे समर्थन केलं आहे. आमच्या नेतृत्वाचा अपमान करायचा मग त्यावर कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त केला ती गुंडगिरी कशी ? कारण नसताना खंडणीसाठी मारहाण केलीय का ? त्याने जे कार्टून फॉरवर्ड केले त्यावर कार्यकर्त्यांचा संताप होता. अधिकाऱ्याने मर्यादा सोडल्याने कर्यकर्यकर्त्यंनी मर्यादा सोडली असल्याचे परब यांनी म्हटले.

अनिल परब पुढे म्हणाले, मुन्ना यादव ज्याला माजी मुख्यमंत्री घेऊन फिरत होते, तो कोण होता ? शिवसेना ज्वलंत सेना आहे. सेनेला धगधगता इतिहास आहे. सत्तेत बसलोय म्हणून कुणीही टपली मारायची, खालच्या भाषेत टीका करायची, घाणेरड्या पोस्ट टाकायच्या, सत्ते बसलो म्हणून काही करायचं नाही, जो कोणी बोलेल त्याचं ऐकून घ्यायचं. हाताची घडी घालून बसायचं का ? असा सवाल परब यांनी केला आहे.

कायदेशीर कारवाई केली तर सत्तेचा दुरुपयोग केला असा आरोप करायचा आणि मारलं तर सरकारचा दुरुपयोग केला जातोय असा आरोप करायचा. संयम आणि मर्यादा दोन्ही बाजू पाळायला हव्यात. टीका करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. कुणीही मर्यादा सोडली तर शिवसैनिक मर्यादा सोडणारच असं त्यांनी सांगितले. अनिल परब हे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी निवृत नैदल अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या मारहाणीचे समर्थन केले.

पंतप्रधानांनी मुंबईत यायचं होतं

मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नसल्याचा आरोप करता मग पंतप्रधान घराच्या बाहेर कधी पडले, कोणत्या राज्यात फिरले. प्रमुख पदावरील व्यक्ती अधिकाऱ्यांशी बोलत असतात. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सगळ्या जिल्ह्यातील ज्या ठिकाणी पोहचता येत नाही तेथील समस्या सोडवता येतात. ज्या व्यक्तीला काम करायचं त्याने कोठुनही काम केले तरी जमतं. इतकं होतं तर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत यायचं होतं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

सगळ्यांच्या डोळ्यात ठाकरे ब्रँड खटकतोय

ठाकरे ब्रँड आधीपासून मजबूत आहे, ठाकरे ब्रँडला कधी आयुष्यात समस्या आली, सगळ्यांच्या डोळ्यात ठाकरे ब्रँड खटकतोय, ठाकरे ब्रँड कमकुवत झाला तर शिवसेना संपेल हा विरोधकांचा डाव आहे. ठाकरे नावा शिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही, ठाकरे ब्रँडच्या नावानं राज्यातील राजकारण फिरत आहे. ठाकरे ब्रँडला धक्का पोहचवण्यासाठी कुणाचीही ताकद नाही, कुवत नाही, ठाकरे ब्रँड हे फक्त नाव नाही तर आमच्यासाठी ते आदराचं विश्वासस्थान असल्याचे परब यांनी सांगितले.