झोपताना तुम्हीदेखील ‘ही’ चूक करता ? येऊ शकतो हार्टअटॅक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आपण जर ‘हेल्दी स्लिप पॅटर्न’ पाळले नाही तर आपल्याला हृदयविकाराचा धोका असू शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या प्रमुख जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात हे उघड झाले आहे. या संशोधनात, 37 ते 73 वर्षे वयोगटातील 408,802 बायोबँक सहभागी समाविष्ट केले गेले. संशोधनानुसार, ‘हेल्दी स्लिप पॅटर्न’ची पद्धत अवलंबणार्‍यांमध्ये हृदयाचा धोका कमी असतो. सकाळी लवकर उठणे, 7 ते 8 तास झोपे घेणे ही ‘हेल्दी स्लीप पॅटर्न’ची महत्त्वपूर्ण लक्षणे असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

पुरेशी झोप घेणे फायदेशीर

संशोधक असेही म्हणतात की, झोपेमध्ये वारंवार त्रास, घोरणे, झोप न लागणे आणि रात्रभर जागणे किंवा जास्त झोप घेणे हे हृदयाच्या आरोग्यास हानिकारक आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, 26 मिलियनहून अधिक लोक हार्ट फेलमुळे प्रभावित झाले आहेत आणि त्याचे कारण अनहेल्दी स्लिप पॅटर्न आहे. पीएचडीचे एमडी, पीडीडी, संबंधित लेखक, एपिडेमिओलॉजीचे प्राध्यापक लू क्वाईने म्हणाले की, ‘हेल्दी स्लिप पॅटर्न’ हे जागे राहणे, घोरणे, लवकर उठणे, झोपायला उशीर, अनिद्रा या पाच गोष्टींवर अवलंवून आहेत. आम्हाला संशोधनात आढळले आहे की, पुरेशी झोप घेणे हृदय आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आकडे हे सांगतात

संशोधनात सामील झालेल्या सहभागींचे स्लिप वर्तन टचस्क्रीन प्रश्नावलीमधून संकलित केले गेले होते. यामध्ये झोपेचा कालावधी तीन गटांमध्ये विभागला गेला आहे, अगदी कमी झोप, 7 तासांपेक्षा कमी झोप आणि 7 ते 8 तासांची झोप. यामध्ये त्या सहभागींना सामिल केले गेले जे दिवसातून 9 तासांपेक्षा जास्त झोपतात अन्यथा दिवसा झोपतात. या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, ‘हेल्दी स्लिप पॅटर्न’ पाळणाऱ्या लोकांमध्ये हृदयाच्या आरोग्याचा धोका अनहेल्दी स्लिप पॅटर्न असलेल्यांपेक्षा 42 टक्के कमी आहे.

You might also like