LIC पॉलिसी न आवडल्यास ‘असे’ मिळवा ‘तात्काळ’ पैसे परत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयुष्यात आपण कधीतरी पॉलिसी खरेदी करत असतोच. मात्र चुकीचे मार्गदर्शन किंवा अपूर्ण माहितीमुळे आपण चुकीची पॉलिसी घेऊन बसतो. मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. आपण पॉलिसीच्या फ्री लूक कालावधीत निर्णय घेऊ शकता. यासाठी तुम्ही कोणतीही पॉलिसी खरेदी केल्यानंतर १५ दिवसाच्या आत ती बंद किंवा बदलू शकता. या फ्री लूक कालावधीचा तुम्ही १५ दिवस लाभ घेऊ शकता. इरडा च्या नियमांनुसार पॉलिसी घेतल्यानंतर १५ दिवसाचा फ्री लूक कालावधी दिला जातो. ज्यात तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. परंतु हा नियम फक्त ३ वर्ष किंवा त्यापुढील जीवन विमा पॉलिसीवरच लागू असेल.

अशा प्रकारे मिळवा लाभ – पॉलिसीधारक इन्शुरन्स कंपनीला फ्री लुक कालावधीसाठी बोलू शकतो. कंपनीच्या वेबसाइटवरून देखील फ्री स्वरूपात डाउनलोड करता येऊ शकते. यामध्ये, पॉलिसीधारकाला पॉलिसी दस्तावेज पावती, एजंटची माहिती आणि रद्द करण्याचे किंवा बदलण्याचे कारण याविषयी माहिती देणे आवश्यक आहे. याशिवाय, पॉलिसीचे मूळ दस्तावेज, पहिल्या हप्त्याची पावती, रद्द करण्याचे चेक आणि इतर कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. पैसे परत करण्याच्या बाबतीत पॉलिसीधारकाने बँक माहिती देखील प्रदान करणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे रद्द करू शकता पॉलिसी – आपण पॉलिसी रद्द करू इच्छित असल्यास, आपला निर्णय कंपनीला थेट कळवू शकतो. पॉलिसी रद्द करण्याचा अर्ज करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात जाणे आवश्यक आहे. अनेक कंपन्या वेबसाइटवर पॉलिसी रद्द करण्याचा फॉर्म देतात, जो आपण डाउनलोड करून भरू शकतो. तुम्ही पॉलिसी रद्द केली तरी तुमचा पहिला हफ्ता तुम्हाला मिळू शकणार नाही. त्याचप्रमाणे कंपनी मेडिकल टेस्ट आणि स्टॅम्प ड्युटीचे पैसे देखील कापून घेते.