31 मार्चची अंतिम तारीख जवळ, जाणून घ्या PAN कार्डला ‘आधार’शी जोडण्याची प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या दैनंदिन जीवनात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही महत्त्वाची दस्तऐवज आहेत. आपल्या प्रत्येक सरकारी कामात ही कागदपत्रे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. अशा परिस्थितीत सरकारने पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी आयकर विभागाने 31 मार्च 2021 तारीख निश्चित केली आहे. आपण 31 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. याशिवाय आयकर कायद्यांतर्गत तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल.

लिंक न केल्यास पॅन होणार अक्षम
केंद्र सरकारने वित्त विधेयक 2021 च्या अंतर्गत प्राप्तिकर अधिनियम 1961 मध्ये जोडलेला कलम 234H पास केला आहे. ते 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर झाले. कलम 234H नुसार जर तुम्ही सरकारने दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत पॅनशी आपले आधार कार्ड जोडले नाहीतर तुम्हाला जास्तीत जास्त 1,000 रुपये दंड आकारला जाईल. शेवटच्या तारखेपर्यंत आपण लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आपला पॅन निष्क्रिय होईल.

आधार पॅनशी लिंक करण्यासाठी दोन पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत.

आयकर वेबसाइटद्वारे :
– प्रथम आयकर वेबसाइटवर जा
– आधार कार्डमध्ये दिलेले नाव, पॅन नंबर आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा
– आधार कार्डमध्ये, जन्माच्या वर्षाचा उल्लेख केल्यावर फक्त चौकोनावर टिक करा
– आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा
– आता लिंक आधार बटणावर क्लिक करा
– आपला पॅन आधारशी जोडला जाईल.

एसएमएस पाठवून
-यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल
– त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक आणि त्यानंतर 10 अंकी पॅन नंबर लिहा. आता हा संदेश 567678 किंवा 56161 वर पाठवा.