रशीद खानने मारलेला ‘हेलिकॉप्टर शॉट’ पाहिला नसेल तर एकदा नक्की पहा

वृत्तसंस्था : टी१० लीग स्पर्धेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या स्पर्धेत पखतून्सने मराठा अरेबियन्स संघावर ८ गडी विजय मिळवल्याचे दिसून आले. पखतून्स संघाला १२७ धावांचे आव्हान होते. मराठा अरेबियन्स संघाने १० षटकात १२६ धावा केल्या होत्या. परंतु हे आव्हान पखतून्स संघाने ९.२ षटकांतच पार केल्याचे दिसून आले. या सामन्यात शफिकउल्लाहने ३५ धावांची खेळी करताना संघाच्या विजयात हातभार लावला तर कॅमेरून डेलपोर्ट याच्या नाबाद ३६ आणि कॉलिन इनग्राम याच्या नाबाद ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर हे आव्हान त्यांनी पूर्ण केले.
रशीद खानने मारलेल्या  हेलिकॉप्टर शॉटची चर्चा या सामन्यात विशेष रंगल्याची पाहायला मिळाली. हा फटका पखतून्स विरुद्ध अरेबियन्स या सामन्यात रशीदच्या बॅटमधून पाहायला मिळाला. महत्त्वाचे म्हणजे रशीज खानचा हा फटका पाहून अगदी वीरेंद्र सेहवागही खुर्चीतुन उठून टाळ्या वाजवू लागला. अरेबियन्स संघाकडून रशीद खानने हा फटका मारत षटकार वसूल केला. महेंद्रसिंग धोनी याला टॅग करत रशीद खानने स्वतः हा व्हिडीओ ट्विट केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने या फटक्याला लोकप्रियता मिळवून दिली होती.
दरम्यान, पखतून्सने नाणेफेक जिंकून अरेबियन्सना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. अरेबियन्सचे सलामीवीर झटपट माघारी धाडून पखतून्सने हा निर्णय योग्य ठरवला. हझरतुल्लाह जाझई (४) आणि अॅलेक्स हेल्स (६) हे स्वस्तात बाद झाले. नजीबुल्लाह झादरान (३६) आणि कामरान अकमल (२५) यांनी संघाचा डाव सावरला. ब्रेंडन टेलर (२३) आणि रशिद (२१) यांनी तळाला फटकेबाजी करताना संघाला ६ बाद १२५ धावा करून दिल्या.