‘सब्जा’पासून ‘अशा’ पद्धतीनं बनवा आरोग्यदायी आणि टेस्टी नाष्ता, जाणून आश्चर्यकारक फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर तुम्हाला पोटाशी निगडीत समस्या जसे की, अपचन, गॅस, अ‍ॅसिडीटी, छातीत जळजळ, अशक्तपणा, थकवा असेल तर तुम्ही सब्जा या पदार्थाचं आवर्जून सेवन करायला सब्जा हा खूप थंड आणि ऊर्जा देणारा पदार्थ आहे. आज आपण सब्जा खाण्याची योग्य पद्धत आणि याच्या आश्चर्यकारक फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

सब्जा असा पदार्थ आहे ज्यात लोह आणि मॅग्नेशियम असतं. या दोन्ही घटकांमुळं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं तसेच बीपी संतुलित राहतो. ज्यांना एनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेचा त्रास आहे अशा लोकांसाठी याचा खूप फायदा होतो. ज्यांना सतत थकवा जाणवतो किंवा थोडं चालल्यानंतरही थकल्यासारखं वाटतं त्यांनाही याचा लाभ होतो. आर्टरीजमध्ये जमा होणारं फॅट सब्जामुळं रोखलं जातं. सब्जाचं नियमित सेवन केलं तर हृदयाचे आजारही दूर राहतात.

1) गव्हाची पंजीरी

सब्जा तुम्ही गव्हाच्या पंजीरीत साजूक तुपात टाकून आणि भाजूनही खाऊ शकता. यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.

– सर्वात आधी तुम्हाला एका कढईत साजूक तूप घ्या
– जेव्हा तूप गरम होऊन वितळू लागेल तेव्हा त्यात सब्जा टाकून 5 ते 10 सेकंद परतून घ्या
– आता या तूप आणि सब्जाच्या मिश्रणात एक वाटी गव्हाचं पीठ घाला.
– पीठाचा रंग लालसर गुलाबी होत नाही तोपर्यंत हे पीठ भाजत रहा.
– आता यात चवीनुसार मीठ, किसलेलं ओलं खोबरं आणि ड्राय फ्रूट्सचे काही तुकडे मिक्स करा.
– आता तुमची टेस्टी आणि हेल्दी पंजीरी तयार आहे.
– तुम्ही दुधासोबत देखील ही पंजीरी खाऊ शकता.
– पिकलेलं केळ कुस्करून यात टाकूनही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता.

2) साबुदाणा खीर आणि खिचडी

तुम्ही सब्जाचं सेवन साबुदाणा खीर किंवा खिचडीसोबतही करू शकता. एक दिवस खीर आणि एक दिवस खिचडी असा बेत तुम्ही आखू शकता. खीर बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.

– साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवा
– आता एका पॅनमध्ये साजूक तूप घ्या.
– हवं असेल तुम्ही फूड ग्रेड नारळाचं तेलंही वापरू शकता.
– तूप वितळू लागल्यानंतर त्यात सब्जा टाकून परता.
– साबुदाणा पाण्यातून काढून सब्जा आणि तुपासोबत भाजून घ्या.
– 5 ते 10 सेकंदानंतर यात सामान्य तापमान असलेलं दूध घाला. आणि मंद आचेवर 20 ते 25 मिनिटे शिजवा.
– तुमची चविष्ट साबुदाणा खीर नाष्त्यासाठी तयार आहे.

3) गोड न आवडणाऱ्यांसाठी

जर तुम्हाला गोड आवडत नसेल किंवा तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही सब्जा टाकून साबुदाणा खिचडी बनवू शकता. यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.

– साबुदाणा रात्रभर भिजत ठेवा
– सकाळी साबुदाणा पाण्यातून काढून सब्जा आणि तुपात साधी खिचडी बनवताना भाजून शिजवतात तसं शिजवून घ्या.
– चवीसाठी तुम्ही शेंगदाण्याचा कुट घालू शकता.
– गरजेनुसार मीठ किंवा हवी असेल तर चिमुटभर साखरही टाकू शकता.

सब्जाचे फायदे –

1) सब्जाच्या बिया पाण्यातून, दूधातून किंवा सरबतातून घेतल्यास शरीरातील उष्णता कमी होते. उष्णतेचे विकार कमी होण्यास मदत होते. कारण यातील गुणधर्म शरीर थंड ठेवतात.

2) सब्जाचा सरबत पिला तर लघवी करताना होणारा दाह आणि वेदना कमी होतात. यामुळं उन्हाळ्यात होणारा युरीन इंफेक्शनचा धोका कमी होतो.

3) ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी सब्जाचं सेवन आवर्जून करायला हवं.

4) ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांचा त्रास सब्जामुळं कमी होतो.

5) मधुमेह असणाऱ्या लोकांनी जर याचं सेवन केलं तर यामुळं रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि कमी होते.

6) तोंड येणं, मुरूम येणं, पुटकुळ्या येणं, जळजळ त्वचेवर लालसर चट्टे येणं हे विकार सब्जामुळं दूर होतात.

7) सब्जात असणाऱ्या फायबरमुळं पचनक्रिया सुरळीत होते.

8) सब्जातील लोह, प्रथिनं, जीवसत्वे यामुळं केस लांब आणि दाट होण्यास जास्त मदत होते.

सब्जा सरबत

1) सरबत 1 – यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.

– सब्जा अर्धा तास भिजत ठेवा.
– एका भांड्यात पाणी घ्या
– यात गुळ, वेलची पूड, मीठ घालून गुळ चांगला विरघळू द्या. पावडर गुळ असेल तर तो लवकर विरघळतो.
– यात लिंबाचा रस घाला.
– गार्निशिंगसाठी पुदीन्याची पानं तोडून सरबतात घाला.

2) सरबत 2 – यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा.

– एका ग्लासमध्ये पिण्याचं पाणी घ्या.
– यात लिंबाचा रस मिक्स करा.
– आता यात 2 चमचे साखर मिक्स करा.
– साखर विरघळल्यानंतर यात 1 चमचा भिजवलेला सब्जा आणि मीठ टाकून पाणी ढवळून घ्या
– आता यात हवा असेल तर बर्फ टाका.
– तुमचा थंड सरबत पिण्यासाठी तयार आहे.