PAN Aadhaar Linking : आतापर्यंत नाही केलं PAN कार्ड Aadhaar सोबत ‘लिंक’ तर जाणून घ्या काय होईल तुमच्या ‘पॅन’कार्डचं ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) आणि आधार क्रमांक लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2020 आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने अनेक वेळा आधार आणि पॅन जोडण्यासाठी अंतिम मुदत पुढे ढकलली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI ) आधार जारी करतो, तर आयकर विभाग पॅन जारी करतो. नियमांनुसार, अंतिम मुदतीपूर्वी आधार आणि पॅन लिंक केले नसेल तर पॅन कार्ड ‘अवैध’ म्हणून घोषित केले जाते. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, अशा परिस्थितीत पॅनकार्ड ‘निष्क्रिय’ केले जाईल.
पॅन निष्क्रिय झाल्यास काय होईल?
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार पॅन आणि आधार जोडला गेला नाही तर पॅनकार्ड निष्क्रिय केले जाईल. निष्क्रिय म्हणजे आयकर कायद्यांतर्गत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारामध्ये पॅनकार्ड वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ( CBDT ) 13 फेब्रुवारी रोजी एक नोटीस बजावली असून त्यात नमूद केले की, पॅन आणि आधार जोडले गेले नाहीत तर 31 मार्च 2020 पर्यंत पॅन निष्क्रिय करण्यात येईल. या नोटिसमध्ये स्पष्ट करण्यात आले की, या अंतिम मुदतीनंतर पॅन आणि आधार कधीही जोडला जाईल. दोन्ही कागदपत्रे जोडल्यानंतरच पॅनकार्ड चालू होईल. सीबीडीटी फक्त कर विभागासाठीची पॉलिसी ठरवते.
पॅनकार्ड निष्क्रिय कसे होईल
पॅन निष्क्रिय करण्याविषयी सीबीडीटीने अलीकडील जारी केलेल्या नोटिसमध्ये म्हटले की, जर एखाद्याला जुलै 2017 पूर्वी पॅनकार्ड दिले गेले असेल तर ते 31 मार्च 2020 पर्यंत लिंक करणे बंधनकारक आहे. अन्यथा पॅन निष्क्रिय केले जाईल. यानंतर पॅनचा लिंक करण्याशिवाय वापरण्यास परवानगी मिळणार नाही. सोबतच, जर कोणी आपला पॅन आधार लिंक करत नसेल आणि आयकर कायद्यांतर्गत त्याचा वापर करत असेल तर त्याने आपला पॅन सबमिट केलेला नाही असा विचार केला जाईल. यानंतर त्यांना पॅन सादर न करण्याअंतर्गत कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.