Air Pollution : दिवाळीत देशी फटाके फोडले तर लागेल 1 लाखाचा दंड, मंत्री म्हणाले – ‘दिल्लीची हवा खराब करू नका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रदूषणाच्या लढाईत अनेक अभियान राबवली जात आहेत. तरीही बेजबाबदारपणा होत आहे. यामुळेच दिल्ली सरकार ग्रीन दिल्ली अ‍ॅप आणत आहे. सोबतच दिवाळीसाठी सुद्धा सरकारने कठोर पावले उचलली आहेत. इको फ्रेंडली फटाक्यांशिवाय जर देशी फटाके फोडले तर एक लाख रूपयांचा दंड भरावा लागेल. सरकार यासाठी 11 टीम तयार करत आहे. नोव्हेंबरपासून या टीम काम सुरू करतील. सुप्रीम कोर्टचा सुद्धा आदेश आहे की, दिल्लीची हवा खराब करू नये, असे दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी म्हटले आहे.

लोकांच्या जीवनावर फटाक्यांचा परिणाम
मंत्री गोपाल राय यांचे म्हणणे आहे की, फटाक्यांचा धूर हवेला विषारी बनवतो. ही हवा लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहे. यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे की, न्यायालयाच्या निर्णयानुसार दिल्लीत केवळ ग्रीन क्रॅकर्स म्हणजे इको फ्रेंडली फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापराला परवानगी आहे. कारण या फटाक्यांमध्ये सल्फर डाय ऑक्साईड आणि नायट्रोजन खुप कमी प्रमाणात असतो.

ग्रीन क्रॅकरच्या वापराने जो धूर तयार होतो तो खुप कमी असतो. आमच्या एनओसीनुसार, दिल्लीत 93 उत्पादक एजन्सी आहेत, ज्या फायर टेक्निक वापरून क्रॅकर बनवू शकतात. अशाचप्रकारे फटाके आयात करता येऊ शकतात. ही लिस्ट आम्ही वेबसाइटवर अपलोड करू.

कारखाने आणि दुकानांची तपासणी
गोपाल राय यांनी हेदेखील सांगितले की, ग्रीन क्रॅकरचा वापर होत आहे किंवा नाही, यासाठी सुप्रीम कोर्टने पोलिसांना निर्देश दिले होते. डीपीसीसीकडून उद्या नोटीस जारी केली जाईल की त्यांनी देखरेख करावी. 3 नोव्हेंबरपासून अँटी क्रॅकर अभियान जारी करू आणि ते दिवाळीनंतरही जारी राहील. राय यांनी सर्व उत्पादक आणि विक्रेत्यांना सुद्धा आवाहन केले आहे की, दिल्ली तुमची आहे, प्रदुषीत करू नका. नियमांचे पालन करा.