अडचण आल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थिनींनी तसेच संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी काही अडचणी आल्यास त्यांनी त्वरीत पोलिसांकडे तक्रार करावी. त्यांच्या तक्रारीचे निरसण केले जाईल. तसेच पोलिसाकडून महिला तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात बडी कॉप, पोलीस काका तसेच सेवा कार्यप्रणाली भरोसा पथक योजना सुरु केली असल्याचे पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले.
pune police

पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील रमा पुरुषोतत्तम संकुलनात महिला सुरक्षेसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी संस्थेतील विद्यार्थिनींबरोबर संवाद साधला. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव पी. व्ही. शास्त्री, कार्याध्यक्ष प्रमोद गोरे, प्रा. एन. डी. पाटील, संचालिका विद्या देशपांडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यार्थिंनीनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आणि पौर्णिमा गायकवाड यांनी उत्तरे दिली. त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेनंतर पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी वसतिगृहातील मुलांसोबत स्नेह भोजन केले. या कार्यक्रमाला 2000 मुली उपस्थित होत्या. गोरे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी हर्षदा गायकवाड हिने आभार प्रदर्शन केले.
pune police

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/