आयकरचे नवे नियम जारी ! ‘ही’ कामे CASH नं केल्यास आपल्या घरी येईल IT ची नोटीस, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम : आयकर विभागाबाबत (Income Tax Department) एक नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार कंपनीला डिव्हिडंड जारी केल्यानंतर त्याची संपूर्ण माहितीही आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. याव्यतिरिक्त बँका पोस्ट ऑफिस आणि आर्थिक संस्थांनाही व्याजाच्या माध्यमातून होणारी मिळकतीची माहिती आयकरला द्यावी लागणार आहे. रोख व्यवहाराबाबत नवे नियम निश्चित करण्यात आले आहे.

हे लागू केलेले नवे नियम चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या वर्षात हा नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर आयकर विभागही करदात्यांशी याबाबतची पूर्ण माहिती वाटून घेईल. तर नव्या नियमानुसार रक्कम ठेवण्यासाठी मर्यादा देण्यात आली आहे. याद्वारे घरात रोख रक्कम ठेवण्याची अधिकतम मर्यादा ठरवण्यात आल्याने, घरातील रोखीचा स्रोत सांगणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, एकाच वेळी दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम एका व्यक्तीने जमा केली किंवा त्याच्या बचत खात्यातून ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रोख जमा केली तर त्यालाआपला पॅनकार्ड नंबर द्यावा लागेल.

रोख देऊन Pay-order किंवा Demand Draft आपण तयार करत असाल तर Pay-order-DD करतानाही आपल्याला पॅन नंबर द्यावा लागणार आहे. जाणून घ्या नवे नियम. तसेच, घरी ठेवण्याच्या रोखीवर अजूनतरी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु, घरात असलेल्या रोखीचा स्रोत सांगणे बंधनकारक आहे. जर याची माहिती देता आली नाही तर त्याच्यावर १३७ टक्के रुपयांपर्यंतचा दंड लागू होऊ शकणार असल्याची माहिती कर तज्ञांनी दिली आहे.

रोखीबाबतचे नवे नियम :
– २ हजार रुपयांपेक्षा अधिकचे दान रोख पैसे देऊन देता येणार नाही.
– ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रोख व्यवहारात वैद्यकीय खर्चावर आयकरात सवलत मिळणार नाही.
– दहा हजार रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक खर्च रोखीत केल्यास ही रक्कम आपल्या नफ्यात धरली जाईल.
– वीस हजार रुपयांपेक्षा अधिक कर्ज रोख रकमेत देता किंवा घेता येणार नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागणार.
– ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम परदेशी चलन कार्यालयात बदलून घेता येणार नाही.
– दोन लाख रुपयांपेक्षा अधिकची कोणतीही खरेदी रोखीत करता येणार नाही.
– बँकेतून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख बँकेतून काढल्यास TDS लागू होईल.