त्वचा कोरडी होत असेल तर ‘या’ ७ गोष्टी लावू नका

पोलिसनामा ऑनलाईन – हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होऊ लागते. ज्या लोकांची त्वचा आधीच कोरडी असेल त्यांना या हंगामात अधिक समस्या उद्भवतात. त्यात त्वचेवर काही चुकीचे लावल्याने पुरळ उठणे, जळजळ होणे, खाज सुटणे, मुरुमांसारखे समस्या देखील सुरू होते. अशाच काही गोष्टी आहेत ज्या हिवाळ्यामध्ये वापरू नये कारण, यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. जर तुमची त्वचाही कोरडी असेल या गोष्टी वापरणे टाळा.

१) लिंबू
लिंबाचा उपयोग केल्याने केवळ त्वचा कोरडी होत नाही तर जळजळ, पुरळ देखील होतात. कारण त्यात क्षारीय आम्ल असते.

२) तांदळाचे पीठ
हिवाळ्यात त्वचा अधिक संवेदनशील होते म्हणून तांदळाच्या पिठाचा वापर केल्याने त्वचेचे साल निघू शकते म्हणून ते वापरणे टाळावे.

३) टोमॅटो
टोमॅटो त्वचेसाठी खूप फायदेशीर असला तरी हिवाळ्यात तो वापरू नये. कारण, त्याचा प्रभाव अम्लीय आहे, ज्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होऊ शकते.

४) तीव्र सुगंधी उत्पादने
जर त्वचा कोरडी असेल तर जास्त सुगंधी क्रीम किंवा लोशन वापरू नका; कारण यामुळे कोरडेपणा वाढेल. त्याशिवाय ग्लाइकोलिक अॅसिड जास्त प्रमाणात असणारी उत्पादने वापरण्यासही टाळा. यामुळे त्वचा अधिक कोरडे होऊ शकते.

५) कठोर साबण
सल्फेट्स, एक्सट्रा हार्ड आणि एक्टिव रिएक्टेंट्स असलेले साबण वापरू नका; कारण ते त्वचेला नुकसान करू शकतात. यामुळे त्वचेतील ओलावाही कमी होऊ शकतो आणि त्वचा अधिक कोरडी होऊ शकते.

६) गरम पाणी किंवा हिटरचा वापर
हिवाळ्यात गरम पाण्याचा आणि हिटरचा वापर आजकाल सामान्य झाला आहे; परंतु यामुळे त्वचेचा त्वक्स्नेहग्रंथीचा स्त्राव कमी होतो आणि त्वचा कोरडी होते. तसेच हे कोलेजेनची पातळी कमी करते यामुळे सुरकुत्या, फ्रीकलसारखे समस्या वाढू शकतात.

७) मद्य आणि कॉफी पिऊ नका
कोरड्या त्वचेच्या लोकांनी अधिक कॅफिन आणि मद्यपान करणे देखील टाळावे. याशिवाय शक्य तितक्या कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे.

कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपचार जाणून घ्या …
१) कोरफडमध्ये पॉलीसैकराइड गुणधर्म आहेत जे त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवतात.
२) अंघोळीच्या आधी किंवा नंतर संपूर्ण शरीरावर नारळ तेल लावा. यामुळे त्वचा कोरडी होणार नाही.
३) व्हिटॅमिन-ई तेलामुळे त्वचेवरील जळजळ आणि लालसरपणा कमी होतो. तसेच ते ओलावा देखील टिकवून ठेवते.
४) मध नैसर्गिक पद्धतीने त्वचेला मॉइश्चराइझ करते. यामुळे त्वचेला चमक देखील मिळते.