तुम्ही देखील ‘एफडी’ केली असेल तर जाणून घ्या ‘या’ 7 महत्वाच्या गोष्टी, सदैव रहाल फायद्यात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सर्व प्रकारच्या बचत योजनेत फिक्सड डिपॉजिट लोकांच्या सर्वात जास्त पसंतीची बचत योजना आहे, यात मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करतात. याचे सर्वात मोठे कारण आहे, त्याची सुरक्षित जोखीम, कमी कालावधीपासून जास्त कालावधीपर्यंत करता येत असलेली गुंतवणूक. FD विविध प्रकारच्या असतात. पहिली क्युमुलेटिव एफडी आणि दुसरी नॉन क्युमुलेटिव एफडी. यात तिमाही आणि वार्षिक आधारे व्याज मिळते. यात रेग्युलर इंटरवलवर देखील व्याज मिळते.

एफडीच्या सुविधेचा लाभ तुम्ही बँकेबरोबर नॉन बँकिंग फायनेंशिअल कंपन्यामधून घेण्यात येतो. यात 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. एफडी संबंधित अनेक नियम आहेत, जे लक्षात ठेवून तुम्ही बचत योजनेतून उत्तम लाभ मिळवू शकतात.

एफडी गुंतवणूकीचे फायदे –
1. फिक्स्ड डिपॉजिट सर्वात सुरक्षित गुंतवणूकिचा पर्याय मानला जातो.
2. यात गुंतवलेल्या मूळ रक्कमेवर कोणतीही जोखीम नसते, तसेच तुम्हाला एक निश्चित कालावधीनंतर परतावा मिळतो.
3. यात गुंतवण्यात आलेली रक्कम पूर्णता सुरक्षित असते, कारण एफडीवर बाजारातील उतार चढावचा कोणताही परिणाम होत नाही.
4. या योजनेत गुंतवणूकदार माहिन्याला व्याजाचा लाभ घेऊ शकतो.
5. तसेच एफडीवर मिळणारे व्याज दर अधिक असते, परंतू ज्येष्ठ नागरिकांना जास्त परतावा मिळवू शकतात.
6. कोणत्याही एफडीमध्ये एकदाच गुंतवणूक करण्यात येते, जर गुंतवणूकदाराला यानंतर आणखी डिपॉजिट जमा करायचे असेल तर दुसरे एफडी खाते सुरु करावा लागेल.
7. निश्चित कालावधीसाठी एफडी केल्यानंतर मॅच्युरिटीआधी विड्रॉ करता येणार नाही. जर वेळेआधी एफडीची रक्कम काढल्यास तुम्हाला त्यावर दंड लागेल.

एफडीवर काय आहे टॅक्स कपातीचा नियम –
फिक्सड डिपॉजिटवर 0 ते 30 टक्के टॅक्स कपात होते. हे गुंतवणूकदाराच्या इनकम टॅक्स आधारे कापण्यात येतो. जर एक वर्षात 10,000 पेक्षा जास्त कमावता तर तुम्हाला एफडीवर 10 टक्के टॅक्स द्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला पॅन कार्डची प्रत बँकेत जमा करावी लागेल. जर पॅन कार्ड जमा न केल्यास तुम्हाला 20 टक्के टीडीएस लागेल. जर गुंतवणूकदार टॅक्स कापण्यातून सूट मिळवू इच्छित असतील तर त्यांना बँकेत फॉर्म 15 ए सबमिट करावा लागेल. हे त्यांना लागू होते जे कोणत्याही इनकन टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत. टॅक्स कापण्यातून सूट हवी असेल तर ज्येष्ठ नागरिक फॉर्म 15 एच जमा करु शकतात.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी