PM-Kisan योजनेव्दारे पाठविण्यात आलेली रक्कम मिळाली नसेल तर ‘इथं’ करा संपर्क, नोंदवा तक्रार

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा आठवा हप्ता शुक्रवारी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. मात्र, या योजनेचे लाभार्थी असूनही काही जणांना अदयाप हप्ता मिळाला नसेल तर घाबरून जायचे काही एक कारण नाही. जर एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यावर हप्ता जमा झाला नसेल तर सरकारने अशा लाभार्थ्यांसाठी काही हेल्पलाइन क्रंमाक जारी केले आहेत. त्यावर संपर्क करून तक्रार दाखल करु शकता. त्याचबरेाबर लेखापाल किंवा कृषी विभागाशी संपर्क साधूनही याबाबतच तक्रार नोंदवू शकता.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात येत आहेत. परंतु, काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांला अनुदानाची रक्कम मिळत नाही. अनेकदा शेतकऱ्यांनी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि खाते क्रमांक यामध्ये गोंधळ असल्यास ते पैसे संबंधितला पोहोचत नाही. अशा वेळी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या लेखापाल किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून याबाबत सविस्तर माहिती द्यावी. जर येथे समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास किंवा काम न झाल्यास सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार करू शकता. पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर ०११-२४३००६०६/०११-२३३८१०९२ यावर संपर्क करु शकता किंवा पीएम-किसान हेल्प डेस्क चा ई-मेल (Email) [email protected] यावर देखील आपण तक्रार करू शकता.परंतु, या हेल्प डेस्कवर सोमवार ते शुक्रवारपर्यंतच संपर्क करू शकता.