कामाची गोष्टी ! कर्ज घेतले असेल तर ‘या’ 3 छोट्या चुका कधीही करू नका, होऊ शकते मोठे नुकसान;जाणून घ्या

नवी दिल्ली : घर, कार, मोबाइल, टीव्ही, फ्रिज सारख्या वस्तू सहज मिळणार्‍या कर्जामुळे लोक अनेक प्रकारची कर्ज (loan) घेतात. कर्ज घेणे आणि फेडणे अशी कामं आहेत जी जवळपास सर्वच लोक कधी तरी करत असतात. जे थेट बँकेतून कर्ज (loan) घेत नाहीत ते एक तर क्रेडिट कार्डने शॉपिंग करतात किंवा एखादे प्रॉडक्ट ईएमआयवर खरेदी करतात. मात्र हे कर्ज (loan) फेडताना अशा काही चुका होतात ज्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागते. या चुका जाणून घेवूयात…

30 दिवसांच्या उशीराने क्रेडिट स्कोअर होऊ शकतो100 पॉईंट कमी –
काही लोक नेहमी आपल्या क्रेडिट कार्डचे पैसे भरणे किंवा ईएमआय अखेरच्या तारखेपर्यंत भरण्यास निष्काळजीपणा करतात. जर तुम्ही 1-2 दिवस उशीर केला तरी याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम होणार नाही पण असे केले नाही पाहिजे. 1 दिवस पैसे भरण्यास उशीर झाल्यामुळे तुम्हाला लेट फी सह अनेक चार्ज लागतात. बँक किंवा इतर आर्थिक संस्था तोपर्यंत यास डिफॉल्ट प्रमाणे ट्रीट करत नाहीत, जोपर्यंत तुम्ही पैसे भरण्यासाठी 30 दिवसांचा उशीर करत नाही. 30 दिवसांनी पैसे भरण्याचा अर्थ तुमचा क्रेडिट स्कोअर 100 पॉईंटने कमी होऊ शकतो आणि सुमारे 7 वर्षापर्यंत याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर राहू शकतो. यासाठी, चांगला व्यवहार तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू सुद्धा शकतो.

कर्ज चुकवण्यासाठी रिटायर्मेंट फंडचा वापर करू नका –
अनेक लोक आपले कर्ज फेडण्यासाठी आपल्या रिटायर्मेंट फंडचा वापर सुद्धा करतात. जर दिवळखोरीची पाळी आली तरी लोक दिवाळखोरीसाठी फाइल करण्याऐवजी रिटायर्मेंट फंड काढून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात, जी खुप चुकीची प्रॅक्टिस आहे. जर दिवाळखोर होण्याची पाळी आली तरी सुद्धा रिटायर्मेट फंड सुरक्षित राहतो, परंतु जर तुम्ही तो अकाऊंटमधूनच काढाल तर ते सुरक्षित राहणार नाही.

प्रायमरी बॉरोअर असाल तर तुम्हालाच चुकवावे लागतील सर्व पैसे –
नेहमी लोक आपला मित्र किंवा एखाद्या नातेवाईकासोबत मिळून एखादे कर्ज घेतात. भारतासारख्या देशात नात्यांना खुप महत्व असते, जर एखादा मित्र-नातेवाईक अशा कर्जाबाबत बोलतो तेव्हा एकावेळेसाठी त्याला नाही म्हणणे अवघड होते. मात्र, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, ज्याच्या सोबत मिळून तुम्ही कर्ज घेत आहात तो कर्ज फेडू शकतो किंवा नाही. जर तुम्हाला वाटले की, त्यास कर्ज चुकवण्यास त्रास होऊ शकतो तर त्याच्यासोबत मिळून कर्ज घेणे टाळा, मग यासाठी तुम्हाला कितीही खरी-खोटी कारणे सांगावी लागतील तरी चालू शकतात. जर तुमचा सहकारी कर्ज परतफेड करू शकला नाही तर तुम्ही प्रायमरी बॉरोअर असाल तर तुम्हाला कर्जाचे सर्व पैसे फेडावे लागू शकतात.

 

Also Read This : 

Pune : पुणेकरांसाठी मोठा दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

 

‘सॉक्स’ घालून झोपण्याचे फायदे अन् तोटे ! जाणून घ्या

 

Pune : ‘सीरम’कडून लस मिळत असतानाही भाजप पुणेकरांच्या जीवाशी का खेळतोय ? व्यवहार टक्केवारीसाठी अडलायं की अंतर्गत कलहामुळे – माजी आमदार मोहन जोशी

 

तुम्ही देखील जोडीदाराच्या घोरण्यामुळे आहात ‘परेशान’? स्वयंपाक घरातील ‘या’ 7 गोष्टी आहेत रामबाण उपाय, जाणून घ्या

Pune : व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ

 

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या