मुख्यमंत्र्यांचं भाजपाला आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल तर माझं सरकार पाडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापसून हे सरकार लवकरच कोसळेल असा सूर भाजपाने लावला आहे. मात्र, यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief-minister-uddhav-thackeray) यांनी रविवारी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपचा खरपूस समाचार घेतला. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालोय तेव्हापासून माझं सरकार पाडण्याच्या विविध तारखांबाबत मी ऐकत आहे. मात्र, ते अद्यापही घडले नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर पुढे जा आणि ते करुन दाखवा (if-you-have-the-courage-overthrow-my-government) असे थेट आव्हानचं त्यांनी भाजपाला दिले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देश कोरोनाच्या संकटातून जात असताना केंद्र सरकारची नजर बिगर भाजपा राज्यातील सरकारे पाडण्याकडे होती. भाजपाच्या सत्तेच्या या लोभामुळे देश सध्या अराजकतेच्या दिशेने चालला आहे. आपल्या या वृत्तीमुळे भाजपा सहकाऱ्यांना गमावत आहे. आता तर एनडीएही संपली आहे. ते मैत्रीची भाषा करतात आणि त्यानंतर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसतात. बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर ते नितिशकुमार यांनाही अशीच वागणूक मिळणार आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. मंदिर खुली न केल्यावरुन मुख्यमंत्र्यांना भाजपाने टार्गेट केलं जात आहे. यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं. तुमचं हिंदुत्व थाळ्या-घंटा बडवणारं असेल पण शिवसेनेचं हिंदुत्व हे दहशतवाद्यांना बडवणार असल्याचे ते म्हणाले. कंगना राणावतचा मुद्दा, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या यावरून महाराष्ट्राची बदनामी करणारे या मातीशी बेईमानी करणारे असून तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या केल्यात. आता ते गिळा व ढेकर देऊन गप्प बसा, असे ठाकरी भाषेतील फटकारेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर लगावले.