‘एका मोरेला दाबाल तर हजार मोरे तय्यार’ : हडपसर मतदारसंघात ‘मी’ वसंत मोरे’ नावाच्या टोप्या घालून प्रचार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या पदयात्रेत आज कार्यकर्ते आणि नागरिकांनी मी वसंत मोरे अशा टोप्या आणि टीशर्ट घालून प्रचार केला. ज्यांनी तात्यांना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना या प्रचारातून आज किती वसंत मोरे तयार झालेत ते मोजायला या असं आव्हान कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी यावेळी केलं.

अनेक समर्थकांनी पदयात्रेवरून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. एका समर्थकानं म्हटलं की, “आम्ही वसंत त्यात्या मोरे यांचे कट्टर समर्थक आहोत. खरंच विकास कामे कोणी केली असतील तर ती वसंत तात्या मोरेंनी.”

दुसऱ्या एका समर्थकानं म्हटलं की, “तात्यांनी कात्रजची बाग उभारली आहे. जे आमदार करू शकत नाही एवढं मोठं काम नगरसेवकांनी केलं आहे.” आणखी एकानं म्हटलं की, “तात्यांनी जे काम कात्रजमध्ये केलं ते काम शंभर टक्के हडपसर मतदारसंघात होणार.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

Loading...
You might also like