10 किलो ‘वजन’ कमी केले तर हे ‘आजार’ होतील दूर, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या

असोसिएशन ऑफ फिजीशियन ऑफ इंडिया (एपीआई) च्या 4 दिवसांच्या एपिकॉन-2020 सांगण्यात आले की, वजन कमी केल्यास धोकादायक आजारांपासून दूर राहता येते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, वजन वाढले की गंभीर आजार आपल्या शरीरात शिरकाव करतात. म्हणून वजन नियंत्रणात ठेवणे खुप गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करण्यापेक्षा तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेला एकच उपाय जास्त प्रभावू ठरू शकतो. तज्ज्ञ सांगतात, भविष्यात कॅन्सर, मधुमेह, पोटाचे विकार असे आजार टाळण्यासाठी तुमचे किमान 10 किलो वजन कमी होणे आवश्यक आहे. तर या आजारांपासून तुम्ही वाचू शकता.

हे लक्षात ठेवा

1 अनेक रुग्णांच्या औषधाचा त्यांच्या किडनीवर प्रभाव पडत असतो. वजन कमी पुरेशी झोप घ्यावी. किमान 7 तासांची झोप आवश्यक आहे.

2 वजन कमी करण्यावर झोपण्याची वेळ आणि पद्धत याचाही प्रभाव पडत असतो. प्रयत्न करा की, रोज रात्री झोपण्याची तुमची वेळ एकच असावी.

3 रात्री उशीरा जेवण हे सुद्धा लठ्ठपणाचं कारण आहे. पोटावरील चरबी कमी करायची असेल तर रात्री उशीरा जेवण करू नका.

4 साठ ते सत्तर टक्के लोकांचे वजन हे जास्त आहे. या लोकांनी वजन 10 किलोंनी कमी केलं तर ते आजारांपासून दूर राहू शकतात. या पध्दतीचा अवलंब केल्यास कोणतेही औषध न घेता डायबिटीसवर नियंत्रण मिळवता येते.

5 मैदा, मीठ आणि साखरेचा जास्त वापर केल्याने अनेकांच्या आरोग्याचे नुकसान होते.

6 चाळीस वर्षाचे झाल्यानंतर जशा विविध चाचण्या केल्या जातात तशी ही वैद्यकीय चाचणी तीन महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे.