Lockdown मध्ये EMI वेळेवर भरला असेल तर मग तुमच्या खात्यात येतील पैसे, सरकारनं दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमध्ये तुम्ही देखील लोन मोराटोरियम सुविधेचा फायदा घेतला नाही व तुमचे सर्व हप्ते वेळेवर भरले असेल तर दिवाळीपूर्वी सरकार आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेल. लॉकडाऊनमध्ये वेळेत कर्ज फेडणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून ही ऑफर देण्यात येत आहे. लोन मोराटोरियम काळात ,व्याजदरावर व्याजाबद्दल आपल्या निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती देताना केंद्र सरकारने हे सांगितले. केंद्रातील मोदी सरकारने ही घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, ज्यांनी वेळेवर ईएमआय भरला आहे, त्यांना व्याजावरील व्याजानुसार पैसे परत मिळतील. जे लोक वेळेवर ईएमआय देऊ शकत नाहीत त्यांच्या व्याजावर व्याज सरकार देईल.

कॅशबॅक कोणाला मिळेल ?
सरकारने असे म्हटले आहे की, कर्ज घेतलेल्या सर्व ग्राहकांनी मोराटोरियम सुविधेचा लाभ घेतला नाही आणि वेळेवर ईएमआय भरला, अशा लोकांना कॅशबॅक मिळेल. या योजनेंतर्गत अशा कर्जदारांना साध्या आणि चक्रवाढ व्याजात 6 महिन्यांच्या फरकाचा लाभ मिळेल.

प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले
याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले आणि सांगितले की, ज्यांनी वेळेवर ईएमआय भरला आहे त्यांना व्याजावर व्याजाच्या हिशोबाने रोख रक्कम परत मिळणार आहे. या व्यतिरिक्त जे ज्यांना वेळेवर ईएमआय देऊ शकत नाहीत त्यांच्या व्याजावर व्याज सरकार देईल.

सर्व प्रकारच्या कर्ज घेणाऱ्यांना फायदा होईल
या योजनेंतर्गत गृह कर्ज, शिक्षण कर्ज, क्रेडिट कार्डची थकबाकी, वाहन कर्ज, एमएसएमई कर्ज, ग्राहक टिकाऊ कर्जाचे लाभ मिळतील.

आरबीआयने 6 महिन्यांकरिता कर्ज स्थगित करण्याची सुविधा दिली
कोरोना साथीच्या वेळी आरबीआयने 6 महिन्यांपर्यंत ग्राहकांना कर्ज स्थगितीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. महामारीच्या वेळी ईएमआय भरण्यास जे असमर्थ होते त्या सर्वांनी या सुविधेचा लाभ घेतला होता.

31 मार्चपर्यंत ग्राहकांना ही सुविधा मिळाली होती
ही सुविधा 1 मार्च ते 31 ऑगस्ट दरम्यान देण्यात आली होती. या सुविधेनंतर व्याजावर व्याजाची बाब स्थगिती कालावधीत सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि सरकारने सांगितले की, कर्जदारांना व्याजावर व्याज द्यावे लागणार नाही. याचा सरकारी तिजोरीवर सुमारे 7000 कोटींचा परिणाम होईल.

व्याजावर व्याज माफ केले जाईल
सरकारने 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना लोन मोराटोरियम सुविधेचा लाभ दिला होता. सरकारच्या म्हणण्यानुसार, 6 महिन्यांच्या कर्जाच्या मुदतीत, दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज माफ केले जाईल.