क्लीन शेव करत असाल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – आपल्याला दररोज शेविंग केलंच पाहिजे का ? काही पुरुष हे एकदमच क्लीन शेव करतात. तर काही खूप दाढी वाढवतात. सध्या तर दाढी जास्त वाढवणे हा मुलांमध्ये ट्रेंडच आला आहे. परंतु, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोफेशनल राहावे लागते. त्यासाठी तुम्हाला क्लीन शेव करावी लागते. जाणून घेऊया शेव बद्दल अधिक माहिती.

काहीजण दररोज शेव करतात पण आपण दररोज शेव केल्याने त्याचे काही दुष्परिणाम होतात का? याकडे पुरुषांचं अजिबात लक्ष नसत. पण तुम्ही जर दररोज शेव करत असाल तर ते तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक आहे. कारण तुम्ही जर रोज शेविंग करत असाल तर त्यामुळे तुमच्या त्वचेवर काळे डाग पडतात. त्यामुळे दररोज दाढी करणे हे पुरुषांच्या त्वचेसाठी नुकसानकारक आहे.

तसेच तुम्ही जर रोज दाढी करत असाल तर त्यामुळे तुमच्या त्वचेची आग होते. त्यामुळे आपल्याला दिवसभर नाहक त्रास सहन करावा लागतो. तुम्हाला जर रोज दाढी करायची असेल तर तुम्ही सेविंग करण्याआधी ३० सेकंद चेहऱ्याला वाफ द्या. ज्यामुळे चेहऱ्यावरचे केस नरम होतील व रोमछिद्रे उघडे होतील. यामुळे तुम्हाला लवकर शेव करता येईल व त्रासही होणार नाही. त्याचप्रकारे शेविंग करताना गळ्याच्या खालच्या भागापासून सुरुवात करावी. शेविंग झाल्यानंतर चेहऱ्यावर आफ्टर शेविंग ही क्रीम वापरावी जेणेकरून तुमची त्वचा हायड्रेट व पोषित राहते.