विनातिकीट रेल्वे प्रवास केल्यास हजार रुपयांचा भूर्दंड 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आता लोकल प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार आहे. कारण यापुढे २५० रुपयांवरून थेट चार पट अधिक म्हणजे एक हजार रुपयांच्या दंड आकारण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’570b56b0-7b6e-11e8-a481-bf1d315ef7fd’]

विनातिकीट प्रवास करण्यास कारणीभूत असलेली तिकीट खिडक्यांवरील रांगा हा कळीचा मुद्दा असून या तिकीट खिडक्यांवरील गर्दीमुळे विनातिकीट प्रवास करावा लागत आहे. हा मुद्दा घेऊन ज्यादा दंडास विरोध होऊ शकतो. लोकल मधील विना तिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ती कमी करण्यासाठी २००२ मध्ये ५० रुपयांवरुन २५० रुपये करण्यात आली होती. त्यानंतर बरेच वर्ष दंडामध्ये वाढ करण्यात आली नव्हती. ती वाढ २०१८ मध्ये करण्यात आली आहे. जादा दंडाच्या रक्कमेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कायमस्वरूपी चाप बसेल, असा रेल्वे अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो.