Pune : विकास कामे करायचीयेत तर मला 1 लाखाची खंडणी दे, नगरसेविकेच्या पतीला धमकीचा फोन

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नगरसेविकेच्या पतीलाच एका आरटीआय कार्यकर्त्यांने वॉर्डात विकास कामे करायची असल्यास १ लाखाची खंडणी मगितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एक लाख दे, नाही तर तुला कामे करुन देणार नाही, अशी धमकीही दिली. याप्रकरामुळे राजकीय क्षेत्रासह परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अतुल प्रभाकर नाडे (रा. लोहियानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुषार तानाजीराव पाटील (वय ४२, रा. अनंत निवास, भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार यांची पत्नी अर्चना पाटील या सध्या महापालिकेत नगरसेविका आहेत. तर अतुल नाडे हा माहिती अधिकार कार्यकर्ता आहेत. त्या माहितीच्या आधारे भष्ट्राचाराची प्रकरणे बाहेर काढत असल्याचा त्यांचा दावा आहे.

याबाबत तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लोहियानगर येथील म्हसोबा मंदिरजवळ अतुल नाडे यांनी पाटील व त्यांच्या मित्रांना बोलावून घेतले होते. येथे विकासकामे करायची असेल तर मला १ लाख रुपये दे, नाही तर तुला कामे करुन देणार नाही. अ‍ॅट्रॉसिटीचे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली आहे. नाडे याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचे खडक पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक निरीक्षक बोबडे करीत आहेत.