Post_Banner_Top

म्हणून मोदींना मतदान करू नका ; मनसे महिला कार्यकर्त्यांचा रिक्षाचालवत प्रचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वतः रिक्षा चालवत ‘जगायचे असेल तर भाजपाला मतदान करू नका’ असा प्रचार सुरु केला आहे. महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील स्वतः चालवत हा प्रचार करत आहेत.

लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवत नाहीये मात्र राज ठकरे महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात सभा घेत आहेत. त्याचप्रमाणे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपच्या विरोधात प्रचार करत आहेत. याचदरम्यान, पुण्यातील महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील स्वतः रिक्षा चालवत आणि गर्दीच्या ठिकाणी फिरून जगायचे असेल तर भाजपाला मतदान करू नका असे आवाहन करत आहेत.

रुपाली पाटील ठोंबरे यांना यासंदर्भात प्रसार माध्यमांनी विचारले असता, २०१४साली पंतप्रधानांनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीसह सुखाने जगायचे आहे यासाठी आम्ही पुणेकरांना साद घालत आहोत. असेही त्यांनी म्हंटले. सध्या उन्हाळा चालू आहे. आणि ऊनही खूप आहे. त्यामुळे एकत्र फिरण्यासाठी आम्ही रिक्षाची निवड केली आहे. आणि मनसे लोकसभा निवडणूक लढवत जरी नसली तरी मनसे मतदाराच्या मनात आहे. असेही त्यांनी म्हंटले

Loading...
You might also like