ट्रांजेक्शन अयशस्वी झाल्यास बँक देणार दिवसाचे 100 रुपये नुकसान भरपाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खात्यातून पैसे कपातीनंतर लवकरच ग्राहकाचे पैसे खात्यात परत येतात. परंतु असेही काही वेळा होते, जेव्हा आपल्याला आपले पैसे मिळविण्यासाठी थोडा वेळ लागतो. कधी कधी असेही दिसून येते की, ग्राहकाला त्याच्या पैशासाठी तक्रार करावी लागते. जर आपल्या बाबतीत असे घडले असेल किंवा आपल्याला बँकेच्या या नियमांबद्दल माहिती नसेल, तर तक्रार दाखल केल्याच्या 7 दिवसांच्या आत जर पैसे परत आले नाहीत, तर बँक आपल्याला दररोज 100 रुपये भरपाई देते. अयशस्वी व्यवहाराच्या बाबतीत, आरबीआय (RBI) चे हे नियम 20 सप्टेंबर 2019 पासून लागू आहेत.

UPI ट्रांजेक्शन अयशस्वी झाल्याबद्दल अशाप्रकारे तक्रार
आपला डिजिटल व्यवहार करून पैसे परत न केल्यास आपण यूपीआय अ‍ॅपवर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला पेमेंट हिस्ट्री ऑप्शनवर जावे लागेल. येथे तुम्हाला रेज डिस्प्युटवर जावे लागेल. इथे आपली तक्रार नोंदवा. आपली तक्रार योग्य असल्यास बँक पैसे परत करेल.

ATM ट्रांजेक्शन अयशस्वी झाल्यावर करा हे काम
बँकेकडून दंड मिळविण्यासाठी, ट्रांजेक्शन अयशस्वी झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत आपल्याला तक्रार दाखल करावी लागेल. तुम्हाला बँकेत व्यवहार स्लिप किंवा अकाउंट स्टेटमेंट देऊन तक्रार करावी लागेल. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डाची माहिती बँकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यास सांगावी लागेल. जर आपले पैसे 7 दिवसांच्या आत परत केले गेले नाहीत, तर आपल्याला परिशिष्ट 5 फॉर्म भरावा लागेल. ज्या दिवशी आपण हा फॉर्म भराल त्याच दिवशी आपला दंड सुरू होईल.

अहवाल काय म्हणतो ते पाहा
NPCI च्या अहवालानुसार कॉर्पोरेशन बँकेतील ग्राहकांना शासकीय बँकेत सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. सुमारे 14.8 टक्के ट्रांजेक्शन अयशस्वी झाले आहेत. त्याच वेळी कॅनरा बँकेतील पेमेंट्स 9.8 टक्के, बँक ऑफ इंडियामध्ये 4.2 टक्के अयशस्वी ठरल्या. त्याच वेळी देशातील सर्वांत मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 7.7 टक्के ट्रांजेक्शन अयशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक खासगी बँकांमधील एका टक्क्यापेक्षा कमी व्यवहार अयशस्वी ठरले आहेत. ऑक्टोबरमध्ये कोटक महिंद्रा बँकेचे सर्वाधिक 2.36 ट्रांजेक्शन अयशस्वी झाले.