जर तुमचं International Driving Permit ही वैधता संपली असेल तर ‘या’ मार्गाने करू शकता ‘रिन्यू’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्र सरकारने 7 ऑक्टोबरला नोटीस जारी केली आहे. ज्यात परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडून आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) विषयी सूचना मागितल्या आहेत, या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कोरोना संक्रमणावेळी जे भारतीय परदेशात आहेत आणि त्यांचे आयडीपी कालबाह्य झाले आहेत. त्यांनी सूचना द्याव्यात कि, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये काय दुरुस्ती करावी.

सरकारने स्पष्ट सांगितले आहे की, हे लक्षात आले आहे की, काही नागरिक जे परदेशात प्रवास करतात आणि परदेशात असतात त्यांच्यासाठी, काही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटचा कालावधी संपला आहे. आणि परदेशात त्याचे नूतनीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अशा वेळी आयडीपीमध्ये सुधारणा करण्यासाठी CMVR 1989 मध्ये दुरुस्ती करावी लागेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शनिवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, असे नागरिक भारतीय दूतावास आणि मिशन विदेश पोर्टलमार्फत अर्ज करु शकतात आणि त्यानंतर संबंधित आरटीओद्वारे विचार करण्यासाठी हे अर्ज वाहनमध्ये हलवले जातील. त्यानंतर त्यांचे आयडीपी नूतनीकरण केले जाईल.

तसेच या अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, परदेशी रहिवासी भारतीयांना आयडीपी अर्ज करतांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची आवश्यकता भासणार नाही. कारण अर्जदाराकडे त्यावेळी वैध व्हिसा असेल आणि तो देण्यापूर्वी सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर जे व्हिसाच्या स्थितीत आले आहेत ते परदेशात येत आहेत आणि त्यांना आयडीपी नूतनीकरण करणे शक्य झाले नाही, ते अर्ज देखील करू शकतात.

यासाठी लोक नोटीस बजावल्यानंतर 30 दिवसांच्या आत या पत्त्यावर आपल्या सूचना पाठवू शकतात. सहसचिव (एमव्हीएल, आयटी आणि टोल), ईमेल: [email protected], रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110 001 या क्रमांकावर सूचना पाठविता येतील. वाहन चालविण्याचा परवाना आणि मोटार वाहन कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.