पालकांसाठी महत्वाचं ! तुमची मुलं TV बघून जेवत आहेत तर ‘हे’ नक्की वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर्नल ऑफ न्यूट्रिशन एजुकेशन अ‍ॅँण्ड बिहेवियर या पुस्तकात एक रिसर्च देण्यात आला आहे याचा आणि मुलांच्या जेवताना टीव्ही पाहण्याचा चांगला संबंध आहे. या रिसर्च नुसार मुलं जेवताना जर चांगले पौष्टिक पदार्थ बनवण्याचे कार्यक्रम पाहत असतील तर ते देखील पौष्टिक नसलेल्या गोष्टी खाणे सोडून देतात आणि शरीरासाठी जे पौष्टिक आहे ते खाण्याचा प्रयत्न करतात.

या रिसर्चसाठी नेदर्लंडच्या पाच शाळांमध्ये १२५ मुलांना जवान बनवण्याचे अर्थात कुकीज शो दाखवण्यात आले. या मुलांची दोन विभागात वर्गवारी करण्यात आली होती आणि यात दहा ते बारा वयातील मुलांचा समावेश होता.

यातील एका मुलांच्या विभागाने पौष्टिक नसलेल स्नॅक्स आणि इतर प्रकारचे खाद्यपदार्थ खाण्याचे सोडले होते कारण त्यांना कार्यक्रंदरम्यान पौष्टिक खाण्याच्या रेसिपी दाखवण्यात आल्या होत्या. यावेळी मुलांचे विभाजन केलेल्या एका गटाला पौष्टिक खाणे दाखवण्यात आल्याने हा बदल दिसून आला होता.

या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की जी मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत काही नवीन ट्राय करण्यासाठी घाबरत होती. ती सकारात्मक झाली होती.तसेच यातील संशोधकांनी असा सल्ला दिला की या मुलांना शालेय शिक्षणासोबतच अश्याप्रकारंच शिक्षण आणि कुकिंग शोज दाखवणे गरजेचं आहे. त्यामुलांमधील भीती कमी झालेली दिसून आली. तसंच त्यांना नवीन आणि पौष्टीक खाण्यासाठी फोर्स करण्याची काही गरज उरली नव्हती. या संधोधनातून समोर आलेल्या गोष्टींना अनूसरून पुढिल संशोधन करण्यात येत आहे. मुलांच्या खाण्याबाबत मात्र हा रिसर्च महत्वाचा ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/