LPG Cylinder : मोबाइल नंबर लिंक झाला नाही तरी सहजपणे मिळणार गॅस सिलेंडर, फक्त करा ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशातील सरकारी ऑईल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर 2020पासून बदलणार्‍या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरशी संबधित डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड सध्या टाळला आहे.

जर एखाद्या ग्राहकाचा मोबाइल नंबर गॅस कनेक्शनशी लिंक नसेल तर तुम्हाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. सुमारे 30 टक्के ग्राहकांनी अगोदरच आपले गॅस कनेक्शन मोबाईल नंबरशी लिंक केले आहे.

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड सध्या टाळण्यात आला आहे. या बाबतीत एका सिनियर अधिकार्‍याने सांगितले की, ग्राहक डीएसी करू शकतात, परंतु ते बंधनकारक करण्यात आलेले नाही. म्हणजे हे ग्राहकावर अवलंबून आहे.

अगोदर कंपन्यांनी एक नोव्हेंबरपासून दिल्ली एनसीआर आणि
शंभर स्मार्ट सीटींमध्ये सिलेंडर डिलिव्हरीसाठी डीएसी कोड दाखवणे जरूरी केले होते.

केवळ डीएसी कोडद्वारे बुकिंग केल्यासच तुम्हाला सिलेंडर डिलिव्हरी मिळेल असे नाही. यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी तुम्हाला डिलिव्हरी बॉयला सांगावा लागेल. यानंतर तुमचा सिलेंडर मिळेल.

जर एखाद्या ग्राहकांचा मोबाइल नंबर रजिस्टर्ड नसेल, तर तो अ‍ॅपद्वारे नंबर अपडेट करू शकतो. हे अ‍ॅप डिलिव्हरी बॉयकडे सुद्धा असणार आहे. नंबर अपडेट केल्यानंतर ओटीपी जेनरेट होईल.