‘या’ तीन बँकेतील खातेदारांनी 31 मार्च अखेर दिलेल्या प्रक्रिया पूर्ण करा; अन्यथा येऊ शकते अडचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता IFSC क्रमांकासंदर्भात एक नवीन नियम निघाला आहे. तर याबाबत अनेक महत्वाचे त्यामध्ये बदल करण्यात आल्याने आगामी १ एप्रिल पासून हे बदल लागू करण्यात येणार आहे. तर ज्या व्यक्तीचे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेत खाते आहे अशा व्यक्तींना ३१ मार्च महिना अखेर बँकेतील असणारे सर्व कार्य पूर्ण करणे आवश्यक आहे. तर या दोनही बँकांचे यूनियन बँकेत विलिनीकरण होणार आहे. याबरोबरच पंजाब नॅशनल बँकदेखील १ एप्रिल पासून काही बदल करणार आहे.

दरम्यान, दिलेल्या कालावधीमध्ये लागू केलेले बदल जर ग्राहकांनी ते केले नसल्याने ग्राहकाला बँकेच्या व्यवहारामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. तर आंध्र बँक किंवा कॉर्पोरेशन बँकेत ज्या व्यक्तीचे खाते असेल तर ३१ मार्च महिन्यापासून सर्व खात्यावरील आयएफएससी कोड (IFSC code) बदलण्यात येणार आहे. अर्थातच जो पहिला असणारा आयएफएससी कोड हा १ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. तसेच आंध्र बँकेच्या खातेदारांचा कोड UBIN08 आणि कॉर्पोरेशन बँकेच्या खातेदारांचा कोड UBIN09 पासून सुरु होणार आहे. या समवेत खातेदाराला नवीन चेकबुकही घेण्याचे बंधनकारक केले आहे. जे युनियन बँकेचे असणार आहे.

तसेच बँकांचे विलिनीकरण झाल्याने IFSC कोड आणि MICR कोड हा बदलतो. तर IFSC कोड बदलण्यासाठी खातेदाराला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. वेबसाइट www.unionbankofindia.co.in आहे. तेथे amaigamation Centre वर क्लिक करून खातेदाराच्या IFSC कोड दिसणार आहे. तर बँकेचा ग्राहक क्रमांक 18002082244, 18004251515 किंवा 18004253555 यावर फोन करून देखील याबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता. आंध्र आणि कॉर्पोरेशन या बँके व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनाही त्यांचा IFSC कोड बदलावा लागणार आहे. याबाबत पीएनबीने सूचना ही दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे, १ एप्रिल पासून पीएनबीच्या खातेदारांनी त्यांचा IFSC कोड आणि MICR कोड बदलावा असे बँकेने सांगितले आहे. सर्व बँकेचे व्यवहार नियमित चालण्यासाठी नवीन IFSC कोड असणेआवश्यक आहे. तसेच ज्यांच्याबरोबर नियमित आर्थिक व्यवहार करता त्यांचे खाते क्रमांक देखील बदलावा लागणार आहे.