आय.जी.कृष्णप्रकाश यांना शांतीदुत पदवी प्रदान !

आचार्य शिवमुनीजी म.सा. : जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय युवा अधिवेशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलीस दलातील व्ही.आय.पी.सीक्युरीटीचे आय.जी. कृष्णप्रकाश यांना आचार्य शिवमुनीजी म.सा.यांनी शांतीदुत पदवी देऊन अलंकृत केले. जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय युवा अधिवेशनसाठी ते पुण्यातील वर्धमान सांस्कृतिक केंद्र येथे आले होते.

राष्ट्रीय युवा शाखेच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन आचार्य शिवमुनीजी म.सा.यांच्या सानिध्यात पुणे येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित केले होते. वर्षभर युव शाखेद्वारे केलेले कार्य व पुढील वाटचालीसाठी दरवर्षी हे अधिवेशन भरवण्यात येते. १४ तारखेला संध्याकाळी हस्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तर आज १५ तारखेला आयर्नमँन आय.जी.कृष्णप्रकाश यांचे भाषण ठेवण्यात आले होते.

यावेळी बोलताना कृष्णप्रकाश यांनी सांगितले की, जैन धर्माची शिकवण व पोलिसांचे कार्य एकच आहे. सर्व प्राणी मात्रांचे रक्षण फरक एवढाच आहे जैन धर्म ग्रंथ घेऊन हे सांगत आहे व आम्ही संविधान घेऊन हे काम करीत आहोत. जैन धर्माची शिकवण प्रत्येकांनी पाळली तर कुठेच हिंसा होणार नाही. आपल्या मागील जन्मात झालेल्या चुकांची माफी मागणार एकमेव धर्म आहे तो जैन धर्म वर्धमान महावीरांनी एवढ्या सुंदर विचार असलेल्या धर्माची स्थापना केली हे आपल्या देशाचे भाग्य आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी, महिला अध्यक्षा विमल बाफना, युवा अध्यक्ष सागर सांकला, अजित डुंगरवाल, महेंद्र सुंदेचा मुथ्था, कमलेश नहार, सचिन नहार, आशीष बोरा, नितीन चोपडा, कीर्तीराज दुगड यांच्यासह जैन कॉन्फरन्सचे व चातुर्मास समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like