जिल्ह्यातील कट्टा (रिव्हॉल्व्हर) संस्कृती वर जरब बसवण्यासाठी मोक्का, एमपीडी सारख्या कडक कारवाई सुरू – IG लोहिया

शिक्रापुर : पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात राबवलेली मोहीम प्रभावी असून जिल्ह्यात गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी चांगले काम पुणे ग्रामीण पोलिस करत असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी शिरुर येथे बोलताना दिली.

पुणे ग्रामीण पोलिस दलातील जवळपास सर्वच पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गावठी कट्टयां विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येत आहे. माञ गावठी कट्ट्यांची पाळेमुळे परराज्यात असुन यास पायबंद घालणे हे मोठे आव्हान आहे.त्यामुळे जिल्हयात या पुढील काळात गावठी कट्टयांच्या विरोधात मोहिम अधिक तीव्र करण्यात येइल.तर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी तसेच कट्टा (रिव्हॉल्व्हर) संस्कृती वर जरब बसवण्यासाठी मोक्का, एमपीडी सारख्या कडक कारवाया अधिक कडक करण्यात येतील असे देखील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले तर पोलिसांच्या बदल्याबाबत बोलताना सांगितले कि,पोलिसांच्या अडचणी असल्या तरी बदल्या ह्या शासकीय नियमाप्रमाणे होत असतात.माञ कोणताही पोलिस जर गुंडांना चुकीच्या पद्धतीने थारा देत असेल,संगणमत करुन काम करत असेल तर ते कदापी सहन केले जाणार नाही असे वर्तन करताना कोणी कर्मचारी निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येइल असा सज्जड दम वजा सूचक इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी त्यांनी शिरुर पोलिस स्टेशन च्या समस्या जाणुन घेतल्या. पोलिस स्टेशनच्या वसाहतीची समस्या,मनुष्यबळ अपुरे असल्याचे निदर्शनास आले असुन याठिकाणी तत्काळ अधिकचे तपासी अधिकारी नेमण्याचे आदेश पोलिस अधिक्षकांना देण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,शिरुर पोलिस स्टेशनचे निरीक्षक प्रविण खानापुरे,सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे,पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,सुनिल मोटे व शिरूर पोलिस स्टेशन चे सर्व अंमलदार उपस्थित होते.