IPS अधिकारी रविंद्र शिसवे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्‍त (ज्वाइंट कमिशनर)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (शुक्रवारी) तब्बल 20 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस उप महानिरीक्षक आणि वरिष्ठ पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. गृह विभागाने 4 पोलिस उप महानिरीक्षकांना विशेष पोलिस महानिरीक्षक पदी बढती दिली तर 7 वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना पोलिस उप महानिरीक्षक पदी पदोन्‍नती देण्यात आली आहे. बृहन्मुंबई येथील संरक्षण व सुरक्षा विभागात अप्पर पोलिस आयुक्‍त म्हणून कार्यरत असणार्‍या डॉ. रविंद्र ए. शिसवे यांची पुण्यात पदोन्‍नतीने बदली करण्यात आली आहे. डॉ. शिसवे यांची पुण्याच्या सह पोलिस आयुक्‍त पदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सध्या पुण्याच्या सह आयुक्‍त पदी कार्यरत असलेले शिवाजी बोडके हे दि. 31 मे रोजी सेवा निवृत्‍त होत आहेत. त्यांच्या जागी डॉ. रविंद्र शिसवे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

गृह विभागाने शुक्रवारी केलेल्या इतर बदल्या आणि बढत्या खालील प्रमाणे –

बदली झालेल्या 5 विशेष पोलीस महानिरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.

1. राजकुमार व्हटकर (विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापना, मुंबई ते सह पोलीस आयुक्‍त, नवी मुंबई)
2. निकेत कौशिक (पोलीस आयुक्‍त, रेल्वे, मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र)
3. मधूकर पाण्डे (सह आयुक्‍त, ठाणे शहर ते सह आयुक्‍त, वाहतुक, बृहन्मुंबई)
3. नवल बजाज (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, ठाणे ते सह पोलीस आयुक्‍त, प्रशासन, बृहन्मुंबई)
4. सुरेश मेखला (सह पोलीस आयुक्‍त, नवी मुंबई ते सह पोलीस आयुक्‍त, ठाणे शहर).

विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून पदोन्‍नतीने बदली झालेल्या 4 अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.

1. रविंद्र पी. सेनगांवकर (अप्पर पोलीस आयुक्‍त, दक्षिण विभाग, पुणे शहर ते पोलीस आयुक्‍त, रेल्वे, मुंबई – पदोन्‍नतीने)
2. डॉ. रविंद्र ए. शिसवे (अप्पर पोलीस आयुक्‍त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई ते सह पोलीस आयुक्‍त, पुणे शहर – पदोन्‍नतीने)
3. मकरंद मधुसुदन रानडे (अप्पर आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड ते विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती (सध्याचे पोलीस उप महानिरीक्षक, अमरावती हे पद उन्न्त करून) – पदोन्‍नतीने)
4. राजेश प्रधान (अप्पर पोलीस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, बृहन्मुंबई ते विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापना, महाराष्ट्र राज्य, मुंबई – पदोन्‍नतीने)

डीआयजी/ अप्पर आयुक्‍त म्ळणून पदोन्‍नतीने बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढीलप्रमाणे.

1. अनिल कुंभारे (पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ-8, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, ठाणे शहर – पदोन्‍नतीने)
2. ज्ञानेश्‍वर सदाशिव चव्हाण (पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ-2, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई – पदोन्‍नतीने)
3. दिलीप आर. सावंत (पोलिस उपायुक्‍त, गुन्हे प्रकटीकरण शाखा, बृहन्मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, बृहन्मुंबई – पदोन्‍नतीने)
4. एस.एच. महावरकर (पोलिस उपायुक्‍त, मुख्यालय, सोलापूर शहर ते अप्पर पोलिस आयुक्‍त, उत्‍तर विभाग, नागपूर शहर – पदोन्‍नतीने)
5. एस.डी. येनपुरे (पोलिस उपायुक्‍त, एल.ए. 4, मरोळ, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, पश्‍चिम विभाग, ठाणे शहर – पदोन्‍नतीने), 6. नवीनचंद्र दत्‍ता रेड्डी (पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ – 10, बृहन्मुंबई ते पोलिस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे – सध्याचे पद उन्‍नत करून – पदोन्‍नतीने)
7. रामनाथ लक्ष्मणराव पोकळे (उपायुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, मुंबई ते अप्पर पोलिस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड – पदोन्‍नतीने).

बदल्या झालेल्या 4 डीआयजी/अप्पर पोलिस आयुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे.

1. महादेव बी. तांबडे (पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर ते पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली – नागपूर कॅम्प)
2. सत्यनारायण (अप्पर पोलिस आयुक्‍त, पश्‍चिम विभाग, ठाणे शहर ते पोलिस उप महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा, मुंबई – पद अवनत करून)
3. अंकुश आर. शिंदे (पोलिस महानिरीक्षक, गडचिरोली – नागपूर कॅम्प ते पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर)
4. श्रीकांत तरवडे (पोलिस उपमहानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती ते अप्पर पोलिस आयुक्‍त, दक्षिण विभाग, पुणे शहर)