महिला एसपीचा (SP) आयजी (IG) विरोधात शारिरीक शोषणाचा आरोप

चेन्नई : वृत्तसंस्था

तामिळनाडूमधील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यावर एका महिला आयपीएसने  शारिरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. महिला आयपीएस एसपी पदावर असून आरोपी आयपीएस आयजी पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल होताच, राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. या घटनेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

महिला आयपीएसने लिखित तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, आयजी माझ्याशी गळाभेट घेण्याची संधी पाहत असतात. काहीवेळा माझी जबरदस्तीने गळाभेट घेतली. मला ते चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते. याला मी विरोध केला, तर त्यांनी मला दुसऱ्या कारणावरुन त्रास द्यायला सुरुवात केली.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3b401f5b-a45a-11e8-bf73-3f2c417aa84e’]

गेल्या सात महिन्यांपासून आयजी त्रास देत आहेत. तसेच, रात्री उशिरा कॉल करत होते आणि अश्लील मेसेज पाठवत होते. ज्यावेळी ते आपल्याजवळ बोलवत होते, तेव्हा मोबाइलवर पॉर्न व्हिडीओ पाहत असत. आयजीकडून धमकी देण्यात आल्याचा आरोप सुद्धा महिला एसपीकडून करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ऐकले नाही, तर एसीआर खराब करण्यात येईल अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, महिला एसपीने दुसऱ्या विभागात बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच, याप्रकरणी चौकशी  समिती नेमली आहे. या समितीत डीजीपी सीमा अग्रवाल, एसयू अरुणाचलम आणि डीआयजी थेमोझी यांचा समावेश आहे.