गुन्हेगारांवर वचक असणार्‍या सुनिल रामानंद यांची मुंबईत बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या आयुक्‍तालयात पोलिस सह आयुक्‍त (ज्वाईंट सीपी) म्हणुन कार्यरत असताना अनेक संघटीत गुन्हेगारी टोळयांवर वचक बसविणार्‍या तसेच शहरातील संघटीत गुन्हेगारीचे कंबरडे मोडुन काढणार्‍या सुनिल रामानंद यांची आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागातुन (सीआयडी) राज्य सुरक्षा महामंडळात मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राज्य गृह विभागाने 6 विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सुनिल रामानंद यांची देखील बदली केली आहे. सुनिल रामानंद हे सन 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी नागपूर, बीड, अहमदनगर येथे पोलिस अधीक्षक कर्तव्य बजाविले आहे. राज्य राखीव पोलिस दल, पुणे पोलिस आयुक्‍तालय आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी वेगवेगळया पदांवर काम केले आहे. पुण्यात सह आयुक्‍त म्हणुन कार्यरत असताना त्यांनी एमपीडीए आणि मोक्‍का कायद्याचा वापर करून संघटीत गुन्हेगारी करणार्‍यांचे अक्षरशः कंबरडे मोडले. गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरविणार्‍यांचे देखील धाबे त्यांच्यामुळे दणाणले होते. गुन्हेगारांवर त्यांचा प्रचंड वचक असतानाच त्यांची पुणे आयुक्‍तालयातुन राज्य गुन्हे अन्वेषण शाखेत बदली झाली. त्यानंतर आता तर त्यांची चक्‍क राज्य सुरक्षा महामंडळात विशेष महानिरीक्षक म्हणुन बदली करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील १० आईपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या 

IPS तेजस्वी सातपुते साताराच्या नव्या पोलीस अधीक्षक 

इशू सिंधू नगरचे नवीन एस.पी., शर्मा यांची नागपूर सीआयडीला बदली 

विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह ६ विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) बदल्या 

राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या 

राज्यातील ४ पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (DIG) बदल्या