दूधासह ‘हे’ 4 दुग्धजन्य पदार्थ टिकतील जास्तवेळ, ’या’ टेक्निक वापरा, जाणून घ्या

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जास्तकाळ टिकत नाहीत. यामुळे ते वाया जाण्याचा प्रकार सातत्याने घडत असतात. यामुळे नुकसान होते, हे नुकसान टाळायचे असेल तर काही खास टिप्स आपण जाणून घेणार आहोत. हे पदार्थ ठेवताना निष्काळजीपणा केल्यास ते लगेचच खराब होतात. दूध फाटणं, दही खराब होणं, हे टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घेवूयात…

वापरा या टेक्निक

1 तूप
रुम टेंमरेचरवर तूप दीर्घकाळ टिकते. हवाबंद डब्बात ठेवल्यास ते खुप दिवस राहू शकते. तूप फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. मात्र, ओलावा येणार नाही याची काळजी घ्या.

2 दही
दह्यासाठी पॉलिस्टरीन कप वापरतात. पॉलिप्रोपॅलीन, पीव्हीसी यांचाही करू शकता. पॉलिस्टरीन किंवा पॉलिप्रोपॅलिनच्या कपात दही पॅक करून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे ते सहा ते सात दिवसांपर्यंत टिकते.

3 दूध
दूध फाटू नये म्हणून ते खरेदी करताना एक्सपायरी डेट पाहून घ्या. त्यानंतर स्वच्छ पातेल्यात उकळवून घ्या. दूध उकळल्यानंतर थंड करून फ्रीजमध्ये ठेवा. दुधाचं भांड स्वच्छ असावे, अन्यथा दूध खराब होण्याची जास्त शक्यता असते.

4 पनीर
रेफ्रिजरेटर (पाच ते सात अंश से.) तापमानात पनीर सहा दिवस टिकते. पण त्याचा पृष्ठभाग 3 दिवसांनी पिवळा पडतो, तसेच ते थोडे कडक होऊ लागते. यासाठी पनीर अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करून ठेवा. यामुळे रेफ्रिजरेशन तापमानात सहा दिवसांपर्यंत ते उत्तम राहाते. ब्लॉटिंग पेपरमध्ये सुद्धा ठेवू शकता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like