IIFA Awards 2022 Viral Video | ‘IIFA Awards’ च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमान खाननं केली अनन्या पांडे सोबत मस्ती, तो म्हणाला – ‘अनन्या चंकी पांडेची…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लवकरच आयफा अवॉर्ड 2022 (IIFA Awards 2022) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांसोबतच अनेक कलाकरांना ओढ लागली आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार आपली मोलाची हजेरी लावतात. मात्र सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्यातील प्रेस कॉन्फर्न्समधील एक व्हिडिओ व्हायरल (IIFA Awards 2022 Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता सलमान खान, मनीष पॉल, वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री अनन्या पांडे हे दिसत आहे (IIFA Awards 2022 Viral Video).

व्हिडिओमध्ये सलमान (Salman Khan) आणि अनन्या (Ananya Panday) प्रचंड मस्ती करताना दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये सलमान अभिनेत्री अनन्या पांडेला विचारतो, “तुला माहिती आहे का, हा कोणता आयफा पुरस्कार आहे ?’ त्यावर ती म्हणाली,’ हा 2022 आहे.’ तसेच नंतर यावर वरुण आणि मनीष म्हणतात, ‘हे तर वर्ष आहे’. त्यावर ती पटकन म्हणते, ’22वां एडिशन आहे.’ यावर मनीष मस्करीत सलमान खानला म्हणाला, ‘हा अनन्याचा पहिलाच आयफा आहे, तुम्ही काहीतरी टिप देऊ इच्छिता का?’ त्यावर तो अनन्याला म्हणाला ‘नेक्सावाल्यांना विचार ते तुला गाडी फुकट देणार आहे का?’

सलमानच्या या बोलण्याला ती विचारात पडले आणि म्हणते मला गाडी फुकट मिळणार आहे का? त्यानंतर कंफर्म होत की तिला खरंच गाडी मिळणार आहे. त्यावर सलमान तिला म्हणतो, ‘शेवटी चंकी पांडेची मुलगी आहे सर, वडिलांवरच गेली आहे.’ त्याचा या वक्तव्यावर सगळं जोरात हसायला लागतात. खुद्द अनन्याही हसते.

दरम्यान, आयफा पुरस्कार (IIFA Awards 2022 Viral Video) सोहळा दुबईमध्ये होणार आहे. तसेच या सोहळ्यात सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमूख (Riteish Deshmukh) आणि अभिनेता सलमान खान करणार आहे. त्यामुळं रसिक प्रेक्षकांसोबत कलाकारांना सुद्धा या सोहळ्याची तुफान उत्सुकता लागली आहे (Upcpming IIFA Awards).

web title : IIFA Awards 2022 Viral Video | iifa awards 2022 press conference salman khan had fun with ananya panday with varun dhawan maniesh paul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा