IIT Bombay Recruitment 2021 | आयआयटी मुंबईत ‘या’ पदांसाठी होणार भरती; 1 लाख रूपयांपर्यंत पगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  IIT Bombay Recruitment 2021 | मुंबई येथील इंडियन  इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (Indian Institute of Technology Bombay) लवकरच भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहे. या भरतीबाबत (IIT Bombay Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीनं करायचा आहे.

पदे – एकूण – 50 जागा

– सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

पीएच.डी. प्रथम श्रेणी किंवा समकक्ष (ग्रेड इ. च्या दृष्टीने) आधीच्या पदवीवर आणि संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड असणं आवश्यक. तसंच संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये शिकवण्याचा अनुभव आवश्यक. पीएचडीनंतर किमान तीन वर्षे अध्यापन/संशोधन/व्यावसायिक अनुभव आवश्यक.

या विभागात संधी –

एरोस्पेस अभियांत्रिकी, बायोसायन्सेस आणि बायोइंजिनियरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग, अर्थ सायन्सेस, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, एनर्जी सायन्स अँड इंजिनियरिंग, पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी, मानविकी आणि सामाजिक विज्ञान (अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, इंग्रजी , CISTS (संस्कृत) आणि इतिहास), गणित, यांत्रिक अभियांत्रिकी, धातू अभियांत्रिकी आणि साहित्य विज्ञान, भौतिकशास्त्र इत्यादी.

वेतन –

– सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – 1,01,500 /- रुपये प्रतिमहिना, संपूर्ण ३ वर्ष नोकरी पूर्ण केल्यानंतर – 1,31,400/- रुपये प्रतिमहिना

वयाची अट –

35 वर्षांपेक्षा कमी असावे. SC/ST/OBC-NC/PwD उमेदवारांसाठी वयाची सूट

IIT Bombay Recruitment 2021 | अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहितीसाठी –  https://www.iitb.ac.in/en/mission-mode-faculty-recruitment-advertisement

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी –  https://www.iitb.ac.in/mmr

(टिप – अधिक माहिती दिलेल्या वेबसाईटवर पाहावी)

 

Web Title : IIT Bombay Recruitment 2021 | Recruitment for ‘Ya’ posts at IIT Mumbai; Salary up to Rs. 1 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | शिरूर तालुक्याचा नवा ‘पिंपळे पॅटर्न’; यूपीएससी परीक्षेत प्रतीक धुमाळचे घवघवीत यश

Karvy Stock | कार्वी स्टॉक ब्रोकिंगला झटका ! ED ने जप्त केले 700 कोटीचे शेयर, IndusInd व ICICI सह इतर बँकांनाही लावला 2,873 कोटींचा ‘चूना’

Khed-Shivapur Tolanaka | खेड-शिवापूर टोलनाका बंद होणार नाही – NHAI संचालकाची माहिती