‘हर्डा’ आणि ‘चहा’नं होणार ‘करोना’पासून बचाव, IIT तज्ज्ञांचा संशोधनातून खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले असून ते थांबण्याचे नावच घेत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करत आहेत. कारण कोरोना माहामारीला आटोक्यात आणण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नसून ते शोधणं महत्त्वाचं आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून भारतात कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदाची मदत घेतली जात आहे. आयुर्वेदामुळे कोरोनावर मात करता येते का यावर संशोधन सुरु झाले आहे.

दरम्यान दिल्लीतील आयआयटीने (IIT) नुकतेच केलेल्या संशोधनातून एक माहिती समोर आली आहे. चहा आणि हर्डा यांच्या वापरामुळे कोरोनावर मात करता येऊ शकते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात या पदार्थांचे सेवन केल्यास आजारांपासून लांब राहता येऊ शकतं. चहा आणि हर्डा यांच्या वापराने कोरोना संक्रमणावर उपचार केले जाऊ शकतात, अशी माहिती आयआयटीतील तज्ज्ञांनी दिली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोणत्याही आजाराच्या उपचारांसाठी आयुर्वेदिक वनस्पती महत्त्वाच्या ठरतात. आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो.

दिल्लीमधील कुसुम स्कुल ऑफ बायोलॉजिकल साइंसेजचे प्राध्यापक अशोक कुमार पटेल यांनी सांगितले की, चहामध्ये व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेले गुणधर्म असतात. त्यामुळे कोविड-19 च्या संक्रमणासाठी उपाय म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. संशोधनासाठी पटेल यांनी 51 औषधी वनस्पतीची तपासणी केली. त्यांनी सांगितले की आमच्या टीमने व्हायरसशी लढत असलेल्या औषधी वनस्पतींवर संशोधन केले आहे. प्रयोगशाळेत व्हायरसचे प्रमुख प्रोटीन 3 सीएलप्रो प्रोटीकन क्लोन तयार करून त्यावर प्रयोग केला. त्यामध्ये असे दिसून आले की, ब्लॅक टी आणि ग्रीन टी व्हायरसच्या मुख्य प्रोटीन्सीची वाढ थांबवण्यासाठी उपयोगी ठरतात.

चहा आणि इतर औषधी वनस्पतींमध्ये असलेले गॅलोटिनिन व्हायरस प्रोटीनचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. या संशोधनामध्ये प्राध्यापक पटेल यांच्यासह देसाई राष्ट्रीय योग केंद्राच्या आयुर्वेदिक वैद्य डॉ. मंजू सिंह, पीएचडी विद्यार्थी सौरभ उपाध्याय, प्रवीण कुमार त्रिपाठी, डॉ. शिवा राघवेंद्र, तज्ज्ञ मोहित भारद्वाज यांचा समावेश होता.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आयआयटी, दिल्लीच्या संशोधनावरून सांगितले की, भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही चाहाने होते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांशी लढण्यासाठी चहाचा वापर करता येऊ शकतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार चहा आणि हर्डा यांच्या सेवनाने कोरोना व्हायरसच्या मुख्य प्रोटीन्सची वाढ रोखण्यास मदत होऊ शकते, असं या संशोधनातून दिसून आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like